कोत दाझ्युर
Jump to navigation
Jump to search
कोत दाझ्युर (फ्रेंच: Côte d'Azur; इंग्लिश: French Riviera; फ्रेंच रिव्हिएरा; ऑक्सितान: Còsta d'Azur) हा फ्रान्सच्या आग्नेय भागातील (मोनॅकोसह) भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील एक भौगोलिक प्रदेश आहे. ५६० मैल लांब पसरलेल्या फ्रेंच रिव्हिएराच्या पूर्वेला इटली देशाची सीमा असून नीस हे येथील सर्वात मोठे शहर आहे.
येथील सौम्य हवामान, लांबवर पसरलेले समुद्रकिनारे व नैसर्गिक सौंदर्यामुळे फ्रेंच रिव्हिएराला युरोपाच्या पर्यटन पटलावर महत्त्वाचे स्थान आहे. अठराव्या शतकापासून येथे पर्यटन, विरंगुळा व मनोरंजनाच्या सोयी विकसित केल्या गेल्या आहेत.
गॅलरी[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |