कोत्झाकोआल्कोस
Appearance
कोत्झाकोआल्कोस (नाहुआत्ल:सापाचे बिळ) हे मेक्सिकोच्या बेराक्रुथ राज्यातील शहर आहे. हे शहर कोत्झाकोआल्कोस नदीच्या मुखाशी असून मेक्सिकोच्या आखातावरील मोठे बंदर आहे.
या ठिकाणी १,०००पेक्षा अधिक वर्षे मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. १५२२ साली एर्नान कोर्तेझने गोंझालो दि सांदोव्हालला येथे स्पॅनिशांचे गाव वसविण्याचा हुकुम दिला. या शहराचे पहिले नाव व्हिया दि एस्पिरितु सांतो होते. १९००-३६ दरम्यान याचे नाव पुएर्तो मेहिको होते.
कोत्झाकोआल्कोसमध्ये चार खनिजतेल शुद्धकरण कारखाने असून येथे खनिजतेलाशी संबंधित अनेक मोठे उद्योग आहेत.