कोडर्मा
Jump to navigation
Jump to search
कोडर्मा | |
जिल्ह्याचे ठिकाण | |
देश | ![]() |
राज्य | झारखंड |
जिल्हा | कोडर्मा जिल्हा |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
कोडर्मा हे भारताच्या झारखंड राज्याच्या कोडर्मा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. कोडर्मा शहर झारखंडच्या उत्तर भागात राजधानी रांचीच्या १६० किमी उत्तरेस तर बिहारमधील गया शहराच्या ९२ किमी आग्नेयेस स्थित आहे. झुम्री तलैया हे एक लोकप्रिय गाव येथून जवळच आहे.
कोडर्मा रांची-पाटणा महामार्गावर असून कोडर्मा रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्गावर असून येथे राजधानी एक्सप्रेससह अनेक जलद गाड्यांचा थांबा आहे.