कॉन्टिनेन्टल प्रकाशन
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
कॉन्टिनेन्टल प्रकाशन ही पुण्यातील एक पुस्तके प्रसिद्ध करणारी संस्था आहे. हिची स्थापना अनंतराव कुलकर्णी यांनी १ जून १९३८ रोजी केली. स्थापनेनंतरच्या सुमारे ८० वर्षांत कॉन्टिनेन्टलने कथा, कविता, कादंबरी, ललितागद्य, समीक्षा, प्रवासवर्णन, शेती, निसर्ग आणि अनुवाद अशा साहित्य प्रकारांतील १९५० पुस्तके प्रकाशित केली आहेत. या प्रकाशन संस्थेने रशियन लेखक चेकॉव्ह, टॉलस्टॉय, दस्तयेवस्की यांची पुस्तके मराठीत आणली.
द.र. कवठेकर यांचे ‘नादनिनाद’ हे कॉन्टिनेन्टलने प्रकाशित केलेले पहिले पुस्तक. आपलेसे (अनिल अवचट, आरस्पानी (संदीप खरे, प्रलयंकार (रेखा बैजल) ही कॉन्टिनेन्टलने प्रकाशित केलेली काही पुस्तके.
==अन्य प्रसिद्ध पुस्तके==:
- एकटी १९४५ (ना. ह. आपटे)
- ऑक्टोपस (श्री.ना. पेंडसे)
- गारंबीचा बापू (श्री.ना. पेंडसे)
- छावा (शिवाजी सावंत)
- जागतिक इतिहासाचे ओझरते दर्शन (अनुवादित, मूळ लेखक जवाहरलाल नेहरू)
- झुंज (ना.सं. इनामदार)
- झेप (ना.सं. इनामदार)
- तुंबाडचे खोत (श्री.ना. पेंडसे)
- द्राक्षबाग (डॉ. भीमराव भुजबळ)
- भारताचा शोध (अनुवादित, मूळ लेखक जवाहरलाल नेहरू)
- मंत्रावेगळा (ना.सं. इनामदार)
- मुकज्जी (अनुवादित, मूळ लेखक शिवराम कारंथ)
- मृत्युंजय (शिवाजी सावंत)
- युगंधर (शिवाजी सावंत)
- राऊ (ना.सं. इनामदार)
- वि.कृ. श्रोत्रिय यांचे वेदांतील गोष्टी भाग १, २.
- शहेनशाह (ना.सं. इनामदार)
- हद्दपार (श्री.ना. पेंडसे)