कॉड
common name for any of the species of fish in the genus Gadus, and sometimes also some members of the families Euclichthyidae, Moridae and Muraenolepididae | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | organisms known by a particular common name | ||
---|---|---|---|
उपवर्ग | Gadidae, fish as food | ||
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
गॅडिफॉर्मिस गणाच्या गॅडिडी कुलातील निरनिराळ्या जातींच्या माशांना एकत्रितपणे कॉड म्हणतात. हे सागरी मासे आहेत. उत्तर अटलांटिक महासागर, उत्तर पॅसिफिक महासागर आणि बाल्टिक समुद्र यात ते आढळतात. अटलांटिक महासागरात आढणाऱ्या कॉडचे शास्त्रीय नाव गॅडस मोऱ्हुआ आहे. त्याची लांबी ७ सेंमी.पासून १८५ सेंमी पर्यंत असते. वजन ३-१८ किग्रॅ. असून यापेक्षाही जास्त वजनाचे कॉड असल्याची नोंद आहे. कॉडचे डोके मोठे असून बाकीचे शरीर शेपटीकडे निमुळते होत गेलेले असते. तोंड व डोळे मोठे असतात. वरचा जबडा खालच्या जबड्यापेक्षा थोडा पुढे आलेला असतो. पृष्ठपक्ष तीन व गुदपक्ष दोन असतात. शरीरावरील खवले लहान असतात. शरीराचा रंग हिरवा, तपकिरी किंवा तांबडा असतो. मादी एका वर्षात सरासरी ९० लाख अंडी घालते. अंडी लहान व पाण्यावर तरंगणारी असतात. १० ते १५ दिवसांत अंड्यांतून पिले बाहेर पडून पोहू लागतात. अपृष्ठवंशीय प्राणी व लहान मासे हे कॉ़डचे भक्ष्य आहे. भारतात आढळणाऱ्या कॉडचे शास्त्रीय नाव ब्रेग्मॅसेरॉस मॅक्कलेलॅंडाय असे आहे. त्याची लांबी ७-८ सेंमी. असून वजन सु. ३ किग्रॅ. असते.
शरीररचना
[संपादन]डोक्याचा वरचा भाग काळा व पाठीकडचा भाग हिरवा असतो. शरीराच्या दोन्ही बाजू रूपेरी रंगाच्या असतात. पश्चिम किनाऱ्यावर रत्नागिरीपासून भडोचपर्यंत अरबी समुद्रात हे मासे आढळतात. या भागात दरवर्षी हजारो टन कॉड पकडले जातात.कॉड हा मासा खाद्य आहे. याच्या ताज्या यकृतापासून औषधी तेल ‘कॉड लिव्हर ऑईल’ काढतात. या तेलामध्ये ओमेगा-३ मेदाम्ले आणि अ आणि ड ही जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. हे तेल बाजारात द्रवरूप आणि जिलेटीन वेष्टिन गोळ्यांच्या रूपात उपलब्ध असून ते तेल पूरक अन्न म्हणून बालकांना तसेच मुडदूस आणि क्षयरोग झालेल्या रुग्णांना देतात. हे तेल त्वचारोगावरही गुणकारी आहे. तसेच ते भाजल्यावर किंवा जखम झाल्यावर लावतात.कॉडच्या शरीरापासून मिळणारे तेल गुरे, डुकरे आणि कोंबड्यांना पूरक खाद्य म्हणून देतात.
उपयोग
[संपादन]साबण व ग्रीस तयार करण्यासाठी ते वापरतात. लिंबाच्या झाडावरील कवकांचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी या तेलाचा उपयोग होतो. कॉडच्या वाताशयापासून जिलेटीन असलेला ‘आयसिंग्लास’ हा पदार्थ तयार करण्यात येतो. याचा उपयोग बिअर, मद्य व व्हिनेगार स्वच्छ करण्यासाठी होतो. वाताशयाच्या धाग्यापासून जर मिळते. ते कामासाठी वापरतात. कॉडच्या त्वचेपासून उत्तम सरस तयार करतात. त्वचा कमावून त्यापासून कातडे तयार करतात. हे कातडे बूट, चप्पल, पिशव्या, बटवे व चंच्या तयार करण्यासाठी उपयोगात आणतात.