कुइंब्रा
Appearance
(कॉइम्ब्रा या पानावरून पुनर्निर्देशित)
कुइंब्रा Coimbra |
|||
पोर्तुगालमधील शहर | |||
| |||
देश | पोर्तुगाल | ||
जिल्हा | कुइंब्रा | ||
स्थापना वर्ष | इ.स. ४५६ | ||
क्षेत्रफळ | ३१९.४ चौ. किमी (१२३.३ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | १४१ फूट (४३ मी) | ||
लोकसंख्या (२०११) | |||
- शहर | १,४३,३९६ | ||
- घनता | ४४८.९५ /चौ. किमी (१,१६२.८ /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
cm-coimbra.pt |
कुइंब्रा (पोर्तुगीज: Coimbra) हे पोर्तुगाल देशामधील एक शहर आहे. हे शहर पोर्तुगालच्या मध्य भागात मोंदेगू नदीच्या काठावर वसले असून २०११ येथील लोकसंख्या सुमारे १.५ लाख होती. लोकसंख्येच्या बाबतीत कुइंब्राचा पोर्तुगालमध्ये लिस्बन व पोर्तोखालोखाल तिसरा क्रमांक आहे.
कुइंब्रा येथील ऐतिहासिक विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे. इ.स. १५३७ साली स्थापन झालेले येथील कुइंब्रा विद्यापीठ पोर्तुगालमधील सर्वात जुने तर युरोपातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे. तसेच पोर्तुगालमधील प्राचीन शहरांपैकी एक असलेले कुइंब्रा ११३१ ते १२५५ दरम्यान पोर्तुगालच्या राजधानीचे शहर होते.
खेळ
[संपादन]फुटबॉल हा कुइंब्रामधील सर्वात लोकप्रिय खेळ असून प्रिमेइरा लीगामध्ये खेळणारा आकादेमिका दे कुइंब्रा हा येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |