Jump to content

उकडलेल्या कैरीचे पन्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कैरीचे पन्हे या पानावरून पुनर्निर्देशित)

उकडलेल्या कैरीचे पन्हे हे महाराष्ट्र राज्यातील एक उन्हाळी पेय आहे.[]


तयार करण्याची कृती

[संपादन]

आवश्यक साहित्य : १ कैरी, गूळ, साखर, आलं, मीठ, वेलचीपूड, केशर

कृती : कैरी धुऊन वाफवावी. त्याचा गर काढावा. १ वाटी गर असल्यास २ वाट्या गूळ व १ वाटी साखर असे प्रमाण घालावे. (साखर व गूळाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार बदलावे. कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण बदलते.) १/२ चमचा मीठ घालावे . १/२ चमचा आल्याचा रस, १ चमचा वेलची पूड घालावे. सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून एकत्र करावे. अशा प्रकारे पन्ह्याचा बलक तयार करतात.

विशेष सूचना

[संपादन]

यात केशर घातल्यास पन्ह्याला रंग व सुगंध येतो. प्रत्येकवेळी पिण्यासाठी पन्हे तयार करताना वरील मिश्रणात आवश्यक तेवढे पाणी घालावे. अशाप्रकारे आंबट गोड चवीचे पन्हे तयार होते.

औचित्य

[संपादन]
चैत्रगौरीसमोर कैरीचे पन्हे आणि आंब्याची डाळ नैवेद्य

महाराष्ट्रात चैत्रगौरी पूजन प्रसंगी कैरीचे पन्हे आवजून करण्याची पद्धती रूढ आहे.

कैरी
  1. ^ सोवनी संपदा. "उदरभरण नोहे".