केशवराव जेधे
केशवराव मारूती जेधे | |
---|---|
टोपणनाव: | तात्यासाहेब |
जन्म: | २१ एप्रिल, इ.स. १८९६ पुणे |
मृत्यू: | नोव्हेंबर १२, १९५९ पुणे |
चळवळ: | हिंदू बहुजन उद्धार |
संघटना: | ब्राह्मणेतर पक्ष |
पत्रकारिता/ लेखन: | शिवस्मारक |
धर्म: | हिंदू |
प्रभाव: | शाहूमहाराज |
वडील: | मारूती |
केशवराव मारोतराव जेधे (२१ एप्रिल, इ.स. १८९६ - नोव्हेंबर १२, १९५९) हे मराठी राजकारणी, बहुजन समाजोद्धार चळवळीचे नेते होते. जेधे कुटूंब कान्होजी नाईक यांचे वंशज होते. केशवराव जेधे यांचा जन्म २१ एप्रिल, इ.स. १८९६ रोजी पुणे येथे झाला.
केशवरावांना तात्यासाहेब या नावाने ओळखले जाते. केशवराव जेधे यांचा संबंध ब्राह्मणेतर चळवळीशी होता. पुणे येथील जेधे मॅन्शन हे या चळवळीचे केंद्र होते. पुण्यातील प्रसिद्ध स्वारगेट चौक हे त्यांच्या नावावर आहे. केशवरावांनी शिवाजी मराठा हायस्कूल, पुणे येथे शिक्षकाची नोकरी केली. केशवराव जेधे यांनी छत्रपती मेळावा काढून टिळकांच्या शिवजयंतीला आव्हान दिले होते. त्यांनी "शांतीचा गांधी पुतळा। देशा प्यारा जाहला।" ही कविता लिहली.
जेधे हे पुण्यातील देशमुख वंशाचे एक सधन मराठा कुटुंब होते. कुटुंबातील सदस्य सत्यशोधक समाजाचे होते आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात सामाजिक कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.[१] जेथे कुटुंबाकडे पुण्यात एक पितळ कारखान्याची मालकी होती. हा कारखाना जेधे यांच्या सर्वात मोठ्या भावाने चालविला होता. केशवराव सत्यशोधक समाजात सक्रिय कार्य करत असताना, त्यांचे एक भाऊ बाबुराव ब्राह्मणेतर चळवळीत सक्रिय होते. बाबुराव हे कोल्हापूर संस्थांचे छत्रपती शाहू महाराज यांचे निकटवर्तीय होते.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ Jayant Lele (15 December 1981). Elite Pluralism and Class Rule: Political development in Maharashtra, India. University of Toronto Press, Scholarly Publishing Division. p. 53. ISBN 978-1-4875-8657-7.
- ^ Omvedt, G. (1974). Non-Brahmans and Nationalists in Poona. Economic and Political Weekly, 9(6/8), 201-216. Retrieved February 7, 2021, from http://www.jstor.org/stable/4363419