ब्राह्मणेतर चळवळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कै.श्रीधरपंत टिळकांच्या(मृत्यू १९२८) शब्दांत सध्याचे युग हे लोकशाहीचे युग आहे. एकंदर हिंदू समाजही संक्रमणावस्थेत आहे. भगवंतांनी निर्माण केलेली श्रमविभागरूप चातुर्वर्ण्यव्यवस्था गुणकर्मविभागशः चालू राहाती, तर ती अतीव त्याज्य ठरून त्याविरुद्ध बंड पुकारण्याची पाळी कनिष्ठ किंवा निकृष्ठ वर्गावर आली नसती. परंतु देशाच्या दुर्दैवाने चातुर्वर्ण्य जन्मसिद्ध स्वरूपात वज्रलेप होऊन बसल्यामुळे त्यापासून अनर्थ ओढवला आहे. पुरातन काळी वर्णाश्रमधर्माने इष्ट कामगिरी बजावली असेल, असे नाही. परंतु आता चातुर्वर्ण्यास जितक्या लवकर मूठमाती मिळेल तितकी बरी.[१]

अनुक्रमणिका

ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे काय ? आणि त्याची उद्दिष्ट्ये[स्रोत संपादित करा]

भारतीय चातुर्वर्ण्य आणि वतन परंपरेतून निर्माण झालेली विषमता राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अशा सर्व स्तरावरून नष्ट करून समताप्रधान, समानसंधी समाजाच्या सकारात्मक रचनेचे कार्य बहुजनांच्या सक्रियतेने साधणे असे ब्राम्हणेतर चळवळीमध्ये अभिप्रेत होते.

त्या काळीसुद्धा ब्राम्हण समाज मुख्य सत्तेपासून दूर होता आणि ब्राम्हणांचा प्रत्यक्ष प्रभाव मर्यादित होता. तरी सर्व विषमतेस एकट्या आणि संपूर्ण ब्राह्मण समुदायास लक्ष्य करणे हा चळवळीपेक्षा वेगळे मत मांडणार्‍यांचा मुख्य आक्षेप होता. त्यांचा आक्षेप समतावादी सुधारणांना नव्हता तर, ब्राह्मणेतर शब्द ब्राम्हणसमूहलक्षी बनल्यामुळे चळवळीला सरसकट ब्राह्मणद्वेषाचे स्वरूप तर येणार नाही ना अशी शंका व्यक्त करणारा होता.

भारतीय चतुर्वर्ण आणि वतनी व जातीय व्यवस्थेतून निर्माण झालेली विषमता भारतात येणार्‍या परकीय आक्रमकांना वेळोवेळी सोयीची झाली. त्यामुळे अशी विषमता घालवणे आवश्यक आहे या दृष्टिकोनातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तथाकथित उच्च वर्णीयांतून आलेले महात्मा गांधी, साने गुरूजी, वि.दा. सावरकर, श्रीपाद अमृत डांगे, धोडो केशव कर्वे, इत्यादी सामाजिक नेते पुढे आले आणि त्यांनी राजर्षी शाहू आणि आर्यसमाजप्रणीत ब्राम्हणेतर चळवळीस पूरक अशा समाज सुधारणांना आणि अस्पृश्यता निर्मूलन चळवळींना होता होईतो हातभार लावला. हा त्यांचा सहभाग सुधारणावाद्यांना प्रत्येक वेळी पुरेसा वाटलाच असेही नाही.

ऐतिहासिक संदर्भ[स्रोत संपादित करा]

पुरेशा ऐतिहासिक साधनांच्या अभावी सिंधू संस्कृती आणि प्राग्‌ ऐतिहासिक काळाबाबत विविध तर्कच केले जातात. जनुकीय अ‍ॅनालिसिस आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या अभावाने कालौघात निराधार ठरलेला, आर्य हे भारताबाहेरून आले हा तर्क ब्रिटिशकाळात स्वीकारला गेला होता. सनातन ब्राम्हणीय चातुर्वणीय परंपरा या बाहेरून येऊन जेते झालेल्या आर्यांच्या प्रातिनिधिक समजल्या जाऊ लागल्या. यातून दक्षिणी भारतीयांनी स्वतःस द्रविड समजून हिंदवेतर आणि ब्राम्हणेतर चळवळींची कास धरली.

यातच विष्णू आवतार आणि इतर पुराण कथातून असलेल्या संघर्षांचा अर्थही ब्राम्हण-क्षत्रिय वा सवर्ण-मागासवर्गीय अथवा आर्य-अनार्य संघर्ष असा घेतला गेला.

यात भर म्हणजे रामायणकालीन शंबूकवध, आदिवासी एकलव्य आणि सूतपुत्र कर्णास शिक्षण नाकारण्यासंबंधी संबधी रामायण-महाभारतातील उल्लेख. मनुस्मृती आणि शतपथ ब्राह्मणातली शूद्र आणि ब्राम्हणेतर समाजावरील असमान तत्त्वावरील असहिष्णूताही ब्राम्हणेतर समाजास खटकू लागली .

अस्पृश्यतेच्या परंपरा आणि शिक्षणास नकार व प्रत्यक्ष जीवनातील असमानता यामुळे गंजलेल्या बहुजन समाजास बाहेर काढण्याचे प्रयत्न ब्राम्हणेतर आणि संबधित विविध समाज सुधारणा चळवळींच्या योगाने झाला. ब्राम्हण आणि सवर्ण समाजाने कधी कुरकुरत तर कधी स्वत: पुढाकार घेत आर्थिक हितसंबधांचे जमेल तसे रक्षण करीत मार्गक्रमण सुरू ठेवले.

सिंधू संस्कृती आणि प्राग्‌ ऐतिहासिक[स्रोत संपादित करा]

चातुर्वर्ण्यव्यवस्था[स्रोत संपादित करा]

मनुस्मृती शतपथ ब्राम्हण

शैव-अ-शैव वाद[स्रोत संपादित करा]

आर्य-अनार्य वाद[स्रोत संपादित करा]

वेदकालीन व्यवस्था[स्रोत संपादित करा]

वेदोत्तर परशुराम, रामायण, महाभारत संदर्भ[स्रोत संपादित करा]

मुस्लिम पूर्व आणि बौद्ध धर्म ऐतिहासिक संदर्भ[स्रोत संपादित करा]

मुस्लिम आणि मोगल-मध्ययुगीन[स्रोत संपादित करा]

शिवशाही आणि पेशवाईचा काळ[स्रोत संपादित करा]

ब्रिटिश काळ[स्रोत संपादित करा]

वतनपद्धती[स्रोत संपादित करा]

वतन ही गोष्ट वंशपरंपरागत असते. जात, व्यवसाय, काम, उत्पन्न, अधिकार, वडिलोपार्जित संपत्ती, जन्मभूमी या सर्व गोष्टी ‘वतन’ शब्दात अंतर्भूत होतात.

महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतातील ग्रामव्यवस्थेचे एके काळी जे बलस्थान होते, ते म्हणजे वतनपद्धती. त्यातूनच पुढे काही प्रश्न निर्माण झाले. सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत या प्रश्नांमुळे निर्माण झालेली गुंतागुंत सोडणे हे आजच्या समाजसुधारक, राज्यकर्ते व विचारवंतांपुढचे मुख्य आव्हान आहे.

ग्रामजीवन हे कृषिप्रधान असल्यामुळे कृषिविषयक सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी ही वेगवेगळी वतने निर्माण झाली. या वतनातून बलुतेदारी अधिक स्पष्ट होत गेली. तत्कालीन ग्रामसंस्कृतीचा अभ्यास केला तर हे लक्षात येते, की या एकसंध वतन, आसाम्या व बलुतेपद्धतीतून ग्रामीण अर्थव्यवस्था स्वतंत्रपणे कार्यरत राहिली. एकमेकांच्या आर्थिक, वैयक्तिक व धार्मिक स्वरूपाच्या गरजा पूर्ण केल्या जात. एका अर्थाने अलिखित अशी ही ‘सेवापद्धती’ किंवा स्थानिक ‘सर्व्हिस इंडस्ट्री’च होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

फुले शाहू महाराज ते आंबेडकर पर्व[स्रोत संपादित करा]

आंबेडकर उत्तर नामांतर पर्व[स्रोत संपादित करा]

आंबेडकर उत्तर मंडल आयोग पर्व[स्रोत संपादित करा]

मंडल आयोग उत्तर मराठा आरक्षण आणि शिवधर्म पर्व[स्रोत संपादित करा]

मागास,आदीवासी, OBC, बहुजन, सर्वजन, डावे[स्रोत संपादित करा]

जातिउद्धाराच्या चळवळीची सुरुवात कुठून धरावी ?[स्रोत संपादित करा]

जातिनिर्मूलनाच्या चळवळीची सुरूवात करणारे प्रामुख्याने तीन गट आढळतात. एक गट अखिल भारतीय पातळीवरील आदी शंकराचार्य, बसवेश्वर, गुरू नानक देव आणि काही दाक्षिणात्य संतांचा गट. महाराष्ट्राच्या पातळीवर महानुभाव पंथीय, संत ज्ञानेश्वर आणि वारकरीपंथीय संत. या तीन गटांचे कार्य महत्त्वाचे आहे. ब्राम्हण संताचे कार्य ब्राम्हणेतर चळवळ सहसा नाकारताना आढळते. ब्राम्हणेतरांच्या उद्धारासाठीचा खरा सकारामक आणि लक्षणीय प्रयत्न महात्मा फुले, राजर्षी शाहू, आंबेडकर आणि तमिळ नेते यांच्यापासूनच सुरू झाला . आधीच्या समाजसुधारकांच्या प्रयत्नांना ब्राम्हणेतर प्रभावशाली मानत नाहीत.

सनातनी आणि सुधारक वाद[स्रोत संपादित करा]

  • समता आणि समरसता

लोकमान्य टिळकांच्या काळातच सनातनी आणि सुधारक यांच्यातील वाद झगड्यांच्या स्वरुपात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वेळी दिसून येत असत. या वादाचे एक वैशिष्ट्य असेकी लोकमान्यांची स्वतःची दोन्ही मुले सुधारकांच्या बाजूने क्रियाशील होती.

लोकमान्य टिळकांना ब्राम्हणेतरांना सरसकट शिक्षण नाकारले गेले हा मुद्दा मान्य नव्हता. ब्राम्हणेतरांच्या अशिक्षणास ब्राम्हणेतरांची उदरनिर्वाह करणे अणि धनधान्यादी उत्पन्न मिळवणे ही प्राथमिकता होती म्हणून ते स्वतःच शिक्षणाबाबत उदासीन आहेत असा निष्कर्ष लोकमान्य टिळख काढतात.

साहजिकच, लोकमान्यांनी भारतात आलेल्या माँटेग्यू- चेम्सफर्ड यांच्या बरोबरील चर्चेत जातिनिहाय मतदारसंघांस विरोध केला होता.

ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना शिक्षणापासून वंचित ठेवले, हा मुद्दा खोडून काढतांना लोकमान्य टिळक आपल्या अग्रलेखात म्हणतात,

एकाने विद्या, तर दुसर्‍याने द्रव्य पसंत केले ! `प्रत्येक जातीने आपापले हित दक्षतेने पहाणे व त्याकरिता योग्य ती चळवळ करणे जरूर असले, तरी अखिल हिंदी जनतेचा `ब्राह्मण व ब्राह्मणेतर' असा स्थूल विभाग करून जे केवळ ब्राह्मणद्वेषाचे अवास्तविक स्वरूप या वादास देण्यात येत आहे, ते दुष्ट बुद्धीचे आहे. कायदे कौन्सिलातील सर्व जागा किंवा बहुतेक जागा आपणासच असाव्यात, असा हक्क ब्राह्मणांनी पूर्वी केव्हाही सांगितलेला नाही व पुढेही सांगू इच्छित नाहीत. त्यांच्या वाट्याला प्रत्यक्ष व्यवहारात लोकसंख्येच्या प्रमाणाबाहेर जागा पडत असल्या, तर ते त्यांच्या जातिमूलक आग्रहाचे फळ नसून त्यांच्या शिक्षणाचे फळ आहे, ही गोष्ट नाकबूल करणे म्हणजे निवळ आडरानांत शिरणे होय. ब्राह्मणांनी पूर्वी इतर जातींना शिक्षणाच्या बाबतीत मुद्दाम मागे टाकले किंवा दडपून ठेवले हा आरोप सर्वस्वी खोटा आहे. व्यावहारिक शिक्षण व त्याला लागणारी साक्षरता ही क्षत्रिय व वैश्य यांनाच काय, पण शूद्रांनाही खुली होती. पुराण, इतिहास वगैरे वाचण्याचा त्यांचा अधिकार कोणी कधीही काढून घेतला नव्हता. तात्पर्य, वेदाध्यापनाचा तेवढा अधिकार केवळ ब्राह्मणांसच असला, तरी ज्याला हल्ली आम्ही शिक्षण म्हणतो ते कोणत्याही वर्णाला सुलभ होते; म्हणून ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना शिक्षणरहित ठेवले, या म्हणण्यास काहीच आधार नाही. असे असता शिक्षणाकडे इतर वर्णांनी द्यावे तितके लक्ष दिले नाही. याचे खरे कारण त्यांनी आपापल्या धंद्याकडे विशेष लक्ष दिले व शिक्षणाकडे दुर्लक्ष केले; कारण नुसत्या पुस्तकी कृति दिसण्याला त्या वेळी मान मुळीच नव्हता, हेच होय. आपापल्या धंद्याकडे लक्ष देण्यापासून इतर वर्णांचा आर्थिकदृष्ट्या फार फायदा झाला व ब्राह्मण भेटले की, ते निर्धन व ब्राह्मणेतर म्हटले की ते सधन असा जो सामान्य भेद दिसतो तो त्यामुळेच उत्पन्न झाला आहे. पण या स्थितीस अनुलक्षून `आम्हाला द्रव्योत्पादक धंदा इतर वर्णांनी करू दिला नाही', असे जर ब्राह्मण म्हणतील, तर ती जशी त्यांची चूक होईल तशीच `आम्हांला ब्राह्मणांनी सुशिक्षित होऊ दिले नाही', असे ब्राह्मणेतरांनी म्हणणे हीही चूकच आहे. एकाने द्रव्योत्पादक शिक्षण व द्रव्य पसंत केले. दुसर्‍याने पुस्तकी विद्या व निर्धनत्व पसंत केले, अशी केवळ आपखुषीने पूर्वी वाटणी झाली. याबद्दल परस्परदोष कोणासच लावता येणार नाही.'

शिक्षणविषयक सवलती सर्व प्रजेला समान असतांना ब्राह्मणेतर शिक्षणाकडे वळायला नाखूष असतात असा लोकमान्यांचे मत होते.' पुस्तकी विद्या मिळवण्याच्या कामी ब्राह्मणेतर उदासीन' या अग्रलेखात ते म्हणतात, `ब्राह्मणेतरांत सुशिक्षित मिळतील, तर सरकार त्यांनाच आधी नेमील; पण शिक्षणविषयक सर्व सवलती समान असताही केवळ धंद्याच्या आवडीने ब्राह्मणेतर हे अद्यापि पुस्तकी शिक्षणाकडे वळावे तितके वळत नाहीत, याला कोणी काय करावे !' दुसर्‍या बाजूने न.चि.केळकरांच्या नेतृत्वाखालील केसरी, सुधारकांवर टीकास्त्र सोडत होता. केसरीतील एका तत्कालीन सनातनी टीकेचे उदाहरणः

१९१७ ते २० च्या अवधीत ब्राह्मणेतर किंवा सत्यशोधकी धिंगाण्याने महाराष्ट्रात अनन्वित धुमाकूळ घातला. ह्या धिंगाण्याला चळवळ हे नाव देऊन संबोधणे म्हणजे त्या शब्दाचा व त्या अभिधानाने ओळखावयाच्या इतर कार्याचा अपमान करण्यासारखे आहे. इतकी ही सत्यशोधकी वावटळीची हीन वळवळ होती.[१]

तत्कालीन ब्राह्मण समाजाकडून ब्राम्हणेतरांना हीन लेखले जाणे याच्या प्रतिक्रियेत ब्राम्हणेतर चळवळीच्या उत्तरकाळात म्हणजे एकविसाव्या शतकात ब्राम्हणेतरांनी ब्राह्मणांना हीन लेखण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे आढळून येते [संदर्भ हवा] संत ज्ञानेश्वर, रामदास, एकनाथ, दादोजी कोंडदेव, बाबासाहेब पुरंदरे आदी लोकांबद्दल टिका करण्याची प्रवृत्ती या शतकात वाढीस लागली.

ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व आणि टप्पे[स्रोत संपादित करा]

१९२० नंतर कोल्हापूर नरेश शाहूमहाराज यांच्या उदारमोकळ्या रूपाने ब्राह्मणेतर चळवळीला नेतृत्व मिळाले. त्याकाळात विठ्ठल रामजी शिंदे , डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्यताविरोधी मोहीम हाती घेतली होती

चळवळीचे यश[स्रोत संपादित करा]

ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादातून सुरू झालेली सामाजिक चळवळ ही बौद्धिक व वैचारिक विचारांचे मंथन होती. त्यातून विविध समाजातील व जातिवर्गातील नेतृत्व तयार होत गेले. त्यातून एक बौद्धिक बैठक अस्तित्वात आली; वेदकालापासून आजपर्यंतच्या समाजजीवनाची रहस्ये उलगडण्याचा, त्यातील विकृतींचा व अपप्रवृत्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न होत राहिला. भाषा, संस्कृती, कला, साहित्य, संगीत या सर्व परंपरांची नवी मांडणी होत गेली. एका अर्थाने ही चळवळ सामाजिक व सांस्कृतिक आरोग्यासाठी पोषक ठरली.

चळवळीतील आगामी आकांक्षा[स्रोत संपादित करा]

जातिसंस्थांचे पुनरुज्जीवन[स्रोत संपादित करा]

नव्या वर्गकलहात फक्त सत्तास्पर्धा व स्वतःच्या अस्तित्वाचे रखवालदार तयार होत आहेत. ‘व्होट बँक’ या एवढ्याच निकषावर नेतृत्व तयार होत आहे. हा नवा वर्गकलह व सत्ताकलह ग्रामीण भागात खोलवर रुजत चालला आहे.[२]

हेसुद्धा पाहा[स्रोत संपादित करा]

स्रोत[स्रोत संपादित करा]

संदर्भ[स्रोत संपादित करा]

नोंदी[स्रोत संपादित करा]

  1. १.० १.१ Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3311682.cms. It is a snapshot of the page as it appeared on 18 Dec 2009 08:12:36 GMT.
  2. Google's cache of http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=25211:2009-11-20-05-49-38&catid=110:2009-08-05-07-55-12&Itemid=123. [मृत दुवा] It is a snapshot of the page as it appeared on 8 Jan 2010 18:28:10 GMT.