कृष्णनाथ शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. कृष्णनाथ शर्मा (१ मे, इ.स. १९३४:काशी, उत्तर प्रदेश, भारत - ६ सप्टेंबर, इ.स. २०१५:जे.कृष्ण फाउंडेशन परिसर, बंगळूर, कर्नाटक, भारत) हे एक समाजवादी विचारवंत, बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि अर्थतज्‍ज्ञ होते. १९६१ मध्ये ते काशी विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले व १९९४ मध्ये विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले.

डॉ. आचार्य नरेंद्रदेव यांच्या प्रभावाने कृष्णनाथ हे १९५० साली समाजवादी आंदोलनात सामील झाले. डॉ. राममनोहर लोहिया यांचे ते एक सक्रिय सहयोगी होते. १९५६ मध्ये काशी विश्वनाथ मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी राजनारायण यांच्याबरोबर तुरुंगवास पत्करला होता. असेच सत्याग्रह व आंदोलने केल्याबद्दल त्यांना आयुष्यात एकूण सुमारे १३ वेळा तुरुंगात जावे लागले होते.

भारतातील सामान्य माणसाची रोजची कमाई[संपादन]

शर्मा यांनी सामान्य माणसाची कमाई दिवसाला तीन आणे असल्याचे सिद्ध केले होते, यावरून राममनोहर लोहिया यांना यांनी १९६४-६५ मध्ये संसदेत ही माहिती दिली. त्यापूर्वी ही कमाई १५ आणे आहे असे पंतप्रधान नेहरूंना वाटत होते.

कृष्णनाथ शर्मा हे जन, मॅनकाइंडअंग्रेजी हटाव या नियतकालिकांचे संपादक होते. ब्रह्मविद्या परंपरेचे विद्यार्थी असलेले शर्मा हे जे. कृष्णमूर्तीदलाई लामा यांचे सहकारी होते. अर्थशास्त्रापेक्षा हिंदी साहित्यिक म्हणून ते अधिक प्रसिद्ध होते.

आयुष्याच्या अखेरच्या काळात कृष्णनाथांनी वैराग्य पत्करले होते; कर्नाटकमधील जे. कृष्णमूर्ती फाउंडेशन परिसरात त्यांचे शेवटचे वास्तव्य होते.

प्रा. कृष्णनाथ शर्मा यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • अरुणाचल यात्रा (हिंदी)
  • इम्पॅक्ट ऑफ फॉरेन एड (इंग्रजी)
  • किन्नर धर्म लोक (हिंदी)
  • पृथ्वी परिक्रमा (हिंदी)
  • ‘बौद्ध निबंधावली (हिंदी)
  • लद्दाख में राग विराग (हिंदी)
  • स्पीति में बारिश (हिंदी)
  • हिमालय यात्रा (हिंदी)

कृष्णनाथ शर्मा यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार[संपादन]