कृष्णचंद्र पंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कृष्णचंद्र पंत (जन्म: ऑगस्ट १०, इ.स. १९३१) हे सध्या भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. इ.स. १९९८ पूर्वी ते काँग्रेस पक्षात होते. ते इ.स. १९६२,इ.स. १९६७,इ.स. १९७१ आणि इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोक्सभेवर निवडून गेले.तर इ.स. १९७८ ते इ.स. १९८९ दरम्यान ते राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात शिक्षणमंत्री आणि संरक्षणमंत्री या पदांचे काम बघितले.त्यानंतर इ.स. १९९८ ते इ.स. २००४ या काळात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते.