कृतिका देव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कृतिका देव
जन्म
५ मे
नाशिक, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके दोन गोष्टी, ओ फ्रिदा.
प्रमुख चित्रपट हवाईजादा, हॅप्पी जर्नी, प्राईम टाईम, राजवाडे अँड सन्स, बकेट लिस्ट.

कृतिका देव (जन्म : ५ मे) ही अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे, हवाईजादा, हॅप्पी जर्नी, प्राईम टाईम, राजवाडे अँड सन्स [१], बकेट लिस्ट अश्या अनेक चित्रपटांमधून तिने भूमिका केल्या आहेत, तर इंटरनेट वाला लव्ह [२] या कलर्स हिंदी वाहिनीवरील मालिकेत ती महत्वाच्या भूमिकेत आहे. [३]

सुरुवातीचे जीवन[संपादन]

नाशिकमध्ये जन्मलेल्या कृतिकाने तिचे पदवी (मनोचिकित्सा) शिक्षण सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून पूर्ण केले, अभिनयासोबतच कृतिका हि पारंगत कथ्थक नृत्यांगना असून तिने विद्याहारी देशपांडे यांच्याकडे कथ्थकचे प्रशिक्षण घेतले. [४]

कलाजीवन[संपादन]

कृतिका देवने "दोन गोष्टी", "ओ फ्रिदा" या नाटकातून कला जीवनास प्रारंभ केला [५] [६], यानंतर २०१४ मद्धे आलेल्या हॅप्पी जर्नी या सचिन कुंडलकर दिग्दर्शित चित्रपटात तरुणपणीचे एलीसचे पात्र साकारले, यानंतर २०१५ मद्धे विभू पुरी दिग्दर्शित हवाईजादा या हिंदी चित्रपटात आयुषमान खुराणा, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी शारदा या कलाकारांसोबत "चंपा" हे पात्र साकारले, त्यानंतर २०१५ मधे प्रदर्शित प्राईम टाईम या चित्रपटात तिने बालपणीची काव्य आपटेची भूमिका साकारली, २०१५ मद्धे आलेल्या सचिन कुंडलकर दिग्दर्शित राजवाडे अँड सन्स या चित्रपटात तिने श्वेता राजवाडे हि भूमिका साकारली, २०१८ मधे आलेल्या बकेट लिस्ट या चित्रपटात तिने माधुरी दीक्षित सोबत काम केले.

चित्रपट[संपादन]

 • हवाईजादा [७] [८]
 • हॅप्पी जर्नी
 • प्राईम टाईम
 • राजवाडे अँड सन्स [९]
 • बकेट लिस्ट [१०]

मालिका[संपादन]

 • इंटरनेट वाला लव्ह [११]

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. ^ Rajwade and Sons Movie Review {3.5/5}: Critic Review of Rajwade and Sons by Times of India. 2018-09-12 रोजी पाहिले. 
 2. ^ "Marathi actress Krutika Deo in Colors' E-Love - IWMBUZZ | DailyHunt". DailyHunt (en मजकूर). 2018-09-12 रोजी पाहिले. 
 3. ^ "I have been a fan of Madhuri’s since childhood: Krutika". https://www.hindustantimes.com/ (en मजकूर). 2018-06-14. 2018-09-12 रोजी पाहिले. 
 4. ^ "Nashik youngsters make it big on the silver screen, no languages barred - Times of India". The Times of India. 2018-09-12 रोजी पाहिले. 
 5. ^ "Pune artiste’s play gets selected for Egypt theatre festival". The Indian Express (en-US मजकूर). 2016-04-02. 2018-09-12 रोजी पाहिले. 
 6. ^ "Theatre Review: 2 Goshti - Times of India". The Times of India. 2018-09-12 रोजी पाहिले. 
 7. ^ "Internet Wala Love". Wikipedia (en मजकूर). 2018-09-12. 
 8. ^ "Nashik youngsters make it big on the silver screen, no languages barred - Times of India". The Times of India. 2018-09-12 रोजी पाहिले. 
 9. ^ "The star-studded cast of Rajwade and Sons | The Times of India". The Times of India. 2018-09-12 रोजी पाहिले. 
 10. ^ "Krutika Deo - Movies, Biography, News, Age & Photos | BookMyShow". BookMyShow. 2018-09-12 रोजी पाहिले. 
 11. ^ "Internet Wala Love". Wikipedia (en मजकूर). 2018-09-12.