कुल्याकान नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुल्याकान नदी मेक्सिकोच्या सिनालोआ राज्यातील नदी आहे. ही नदी तामाझुला आणि हुमाया नद्यांच्या संगमापासून सुरू होते व पश्चिमेकडे वाहत कॅलिफोर्नियाच्या अखातास मिळते. कुल्याकान शहर या नदीच्या सुरुवातीस वसलेले आहे.