कुल्याकान
Jump to navigation
Jump to search
कुल्याकान हे मेक्सिकोच्या सिनालोआ राज्याच्या राजधानीचे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,७५,७७३ तर महानगरातील लोकसंख्या ८,५८,६३८ होती. हे शहर तामाझुला आणि हुमाया नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या दोन्ही नद्यांचा एकत्रित प्रवाह येथून पुढे कुल्याकान नदी म्हणून ओळखला जातो.