Jump to content

कुलूप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पॅडलॉक प्रकारातील कुलुप
कुलुपाचा आतील भाग दाखवणारे चित्र

कुलुप म्हणजे ज्याच्या साहाय्याने घराचा दरवाजा, वाहन, गोदाम यांचे प्रवेश केवळ अधिकृत व्यक्तींपर्यंत सीमित करता येऊ शकतात असे यांत्रिक उपकरण होय. कुलपाची सुरक्षा भेदणे शक्य असले तरी देखील कुलूप वापरकर्त्यास तुलनेने कमी खर्चात चांगली सुरक्षा प्रदान करते.

कार्यपद्धती

[संपादन]
कुलुपाची कार्यपद्धती

कुलूप आव्हान व सिद्धता या तत्त्वावर काम करते. म्हणजे प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस स्वतःची प्रवेशाची पात्रता (credentials) सिद्ध करावी लागते. अधिकृत वापरकर्ता आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी किल्लीचा वापर करतो. पारंपरिक कुलपात प्रत्येक कुलूप व त्याच्या किल्लीची एकमेव अनुरूप जोडणी (Combination) असते. जेव्हा किल्लीच्या खाचा कुलुपाच्या आतील खाच्यांशी तंतोतंत जुळतात, तेव्हा कुलुपाच्या आतील रचनेमुळे किल्लीधारकास आतील अडसर सुलभतेने हलवण्याची मुभा मिळते. कुलूप किल्लीच्या एकत्रित एक / दोन फेऱ्यांनी अडसर मोकळा करून वापरकर्ता अधिकृतरीत्या प्रवेश करतो.

प्रकार

[संपादन]
  • सायकलचे कुलूप
  • कॅम कुलूप (Cam lock)
  • अंकरचना कुलूप (Combination lock)
  • क्रुसिफॉर्म लॉकCruciform lock|Cruciform (or Zeiss) lock]]
  • नळकांडीकुलूप (Cylinder lock)
  • डेडबोल्ट कुलूप (Deadbolt)
  • वि-कुलुप (electrnic lock)
  • चुंबकीय कुलूप (Magnetic lock)
  • कीकार्ड कुलूप (Keycard lock)
  • लिव्हर टंबलर कुलूप (Lever tumbler lock)
  • चबशोधक कुलूप (Chubb detector lock)
  • रक्षक कुलूप (Protector lock)
  • चुंबकीय चावीवरील कुलूप (Magnetic keyed lock)
  • अंगचे कुलूप (Padlock)
  • पिन टंबलर कुलूप (Pin tumbler lock)
  • रीम कुलूप (Rim lock)
  • नळकांड्याच्या आकाराचे टंबलर कुलूप (Tubular pin tumbler lock)
  • वेळाधारित कुलूप (Time Lock)
  • टर्नर कुलूप (Turner lock)
  • वेफर टंबलर कुलूप (Wafer tumbler lock)
  • वॉर्डेड कुलूप (Warded lock)

हे सुद्धा पहा

[संपादन]

कडी-कोयंडा


बाह्य दुवे

[संपादन]