किल्ली (कुलुपाची)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

किल्ली या उपकरणाचा उपयोग कुलुप उघडण्यासाठी व लावण्यासाठी होतो. कुलुप- किल्लीमुळे व्यक्तीच्या प्रवेशाची खातरजमा केली जाऊ शकते. किल्लीमुळे मिळणारी सुरक्षा पूर्णतः कडेकोट नसू शकते. तरीदेखील किल्ली ही प्रवेशाची खातरजमा करण्यासाठीचे कमी खर्चाचे उपकरण ठरते.

विविध प्रकारच्या किल्ल्या

इलेक्ट्रॉनिक किल्ल्या[संपादन]

निरनिराळ्या कुलुपांसाठी निरनिराळ्या किल्ल्या उपयोगात असतात. जसे इलेक्ट्रॉनिक कुलुपे असलेल्या दरवाज्यांना ओळखपत्रात इलेक्ट्रॉनिक सर्किटरीद्वारे उघडण्याची सोय असते.

इलेक्ट्रॉनिक कार्ड आणि धातूची किल्ली

नवीन पद्धतीच्या मोटारींच्या कुलुपांच्या किल्ल्या इलेक्ट्रोनिक असतात व त्या दूरनियंत्रकाद्वारे (रीमोट कंट्रोल) चालतात.