कुर्ट ग्योडेल
Jump to navigation
Jump to search
कुर्ट ग्योडेल (जर्मन: Kurt Friedrich Gödel; २८ एप्रिल १९०६, ब्रनो, ऑस्ट्रिया-हंगेरी - १४ जानेवारी १९७८, प्रिन्स्टन, न्यू जर्सी) हा एक ऑस्ट्रियन-अमेरिकन गणितज्ञ, तर्कशास्त्रज्ञ व तत्त्ववेत्ता होता.
व्हियेना येथे पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात ग्योडेलने पत्नीसह अमेरिकेला स्थानांतर केले. तो न्यू जर्सीच्या प्रिन्स्टन शहरामधील इन्स्टिट्यूट फॉर ॲड्व्हान्स स्टडीज ह्या संशोधन संस्थेमध्ये नोकरी स्वीकारली. १९४७ साली त्याने अमेरिकेचे नागरिकत्व घेतले. प्रिन्स्टन येथेच वास्तव्यास असलेला आल्बर्ट आईनस्टाईन व ग्योडेल हे चांगले मित्र होते.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |