कुडमुडे जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


न्याय व्यवस्था पद्धती. 

सोलापुरतील कुडमुडे जोशी ह्यांच्या मध्ये भोसले यांना (पाटील) सर्वोच्च मान दिला जातो, त्यांना जातपंचायतीचे प्रमुख असे देखील म्हणले जाते.न्यायसभा भरविण्याचे काम (दवंडी देण्याचे काम) समाजातील चौगुले घराण्याकडे देण्यात आलेले आहे.सभेत १२ पंच मंडळी उपस्थित असतात.जातपंचायतीचा निर्णय अमान्य केल्यास संबंधित व्यक्तीला अथवा त्याच्या कुटुंबियांना देखील बहिष्कृत ( समजातून बाहेर काढणे , समाजातील इतर लोकांनी त्याच्याशी कोणतेही संबंध ठेऊ नये) केले जाते.हि न्यायव्यवस्था पूर्वपार चालत आलेली आहे.त्याचबरोबर ह्या न्यायव्यवस्थेंचा निर्णय सर्वोच्च असतो.त्याचे काही दंडप्रकार (कलम) आहेत त्यांना ३० कलम असे म्हणतात. त्यामधील तीस कलम सर्व व्यक्तींना माहीतच आहेत असे नाही परंतु माहित असलेले काही दंडप्रकार पुढील प्रमाणे.

सव्वा रुपये दंड

समाजात याला सव्वा लागला असे देखील म्हणतात. हा दंड पिढ्यान पिढ्या लागलेला असतो.  हा दंड ज्यावेळी समाजातील एखाद्या स्त्रीचा एखाद्या पुरुष समोर डोक्यावरून पदर पडला तर तिला हा दंड सुनावला जात असे यामध्ये तिच्या कुटुंबियांनकडून रोख रक्कम सव्वा रुपये घेतली जात असे त्याचं बरोबर तिचे केशवपन (टक्कल) केले जात असे. इतके करून पुन्हा त्या स्त्रीला व तिच्या कुटुंबियांना बहिष्कृत केले जात असे हा दंड अती  तीव्र असा होता. यामध्ये कोणती देखील सूट देण्यात आली नव्हती.

१५ रुपये दंड

समाजात ज्यावेळी अंतरगत कलह निर्माण होतात अशावेळी ते पंचांच्या मध्यस्थीने न्यायनिवाडा समाजाच्या समोर केला जातो. अशावेळी वादी आणि प्रतिवादी व त्यांचे कुटुंबीय पंचांसमोर एकत्र येतात. दोन्ही बाजू समजून घेऊन गुन्हेगारास १५  रुपये दंड केला जातो. ही रक्कम त्याने  अथवा कुटुंबीयांनी ताबडतोब पंचांना द्यावी लागते.

     जर गुन्हेगारास गुन्हा मान्य नसेल तर  ताबडतोब जातपंचायती समोर सांगावे. त्यावर पुन्हा विचार केला जातो आणि त्याला तरी देखील तो अमान्य असेल किंवा तो दंड भरण्यासाठी नकार दिला तर तो पंचांचा अपमान करीत आहे असे समजून त्याला बहिष्कृत केले जाते.

साडेसात रुपये (कलम) (घटस्फोट प्रक्रिया)

५०  (गंधर्वविवाह)

६० रुपये (कलम) (तिसरा विवाह)

कुडमुडे जोशी समाजात पूर्वीपासून घटस्पोट ही प्रक्रिया समाज मान्य आहे. समाजातील विवाहित स्त्रीला जर तिच्या संसारात अडचणी येत असल्यास ती आई-वडिलांच्या मार्फत पंचाना घटस्पोट- न्याय मागू शकते.परंतु जर त्या जोडप्याला आपत्य असेल तर पंच त्यांना एकत्र राहण्याचा हुकूम देते असे निर्णय २-३ वेळा घेतले जातात तरी देखील वादविवाद होत असल्यास मुलगा व  मुलगी या दोघांच्या कुटुंबियांकडून प्रत्येकी साडेसात - साडेसात रुपये    एकूण १५ रुपये रक्कम वसूल केली जाते. व ती पंच व्यक्तीमध्ये वाटली जाते. जर समजा त्यांच्यातील कलह घटस्फोट घेतल्यानंतर कालांतराने मिटले असतील व त्यांना पुन्हा एकत्रित संसार करायचा असल्यास पंचांची परवानगी घ्यावी  लागते.

   त्याचा बरोबर गंधर्वविवाहास देखील मान्यता देण्यात आली आहे.जर का विवाहित स्त्री सोडचिट्टी घेतली आहे परंतु पुन्हा विवाह करायचा असल्यास ती समाजातील इतर पुरुष सोबत लग्न करू शकते. त्याला त्यांच्या समाजात म्हुतुर असे देखील म्हणतात. दुसरे लग्न करते समई पंचाना त्या व्यक्तीच्या लग्नात रुपये रक्कम ५० रुपये दिले  जातात. व त्या लग्नाला पंच मान्यता देते.

    अशाप्रकारे जर दुसरा विवाह होऊन देखील संसारात अडचणी आल्यास ती पंचायतीला पुन्हा आई-वडील यांच्या मार्फत धाव घेऊ शकते. या घटस्पोटाच्या दंडाची रक्कम रुपये ६०  इतकी निरधारीत केलेली आहे.

  एक पैसे (कलम)

ज्यावेळी समाजातील लोकांध्ये आपापसात भांडनं होत असतील आणि त्यावेळी नकोत्या शिव्या हाणामारी पंचांसमोर होत असेल तर त्यांना १ पैसे दंड केला जात असे.

३६० रुपये

३६० कलम नुसार जर एखाद्या व्यक्तीने जर कुणाचा खून, हाफ - मर्डर केला असेल तर त्याला ३६० रुपये दंड ठोठावत असे..तीस कलम या न्यायसदंडातील ही सगळ्यात मोठी रक्कम होती. त्याचा बरोबर जर समाजातील रूढी परंपरा न मानणाऱ्याला देखील ३६० हा दंड सुनावलं जातो.

सव्वा चार रुपये (कलम)     

सव्वा चार रुपये कलम या अनुसार जर एखाद्या मुलीने जर आंतरजातीय विवाह केला तर तिच्याकाडून सव्वा चार रुपये वसूल केले जात व तिला समाजातून बहिष्कृत केले जाई. जर तिच्या कुटुंबीयांनी किंवा समाजातील इतर लोकांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न जरी केला तर त्या पूर्ण कुटुंबास बहिष्कृत केले जाते

कायद्याचे / जातपंचायतीचे  महत्त्व

"बऱ्याच लोकांना वरील जाचक कायदे का केले गेले होते याचे कारण माहित नाही." जसे कि सव्वा चार कलम हा आंतरजातीय विवाह केल्यास त्याच्या कुटुंबियाला व त्याव्यक्तीला बहिष्कृत केले जात असे.परंतु या मागे अनेक करणे होती.१. त्या काळामध्ये स्त्रियांचे प्रमाण हे कमी होते व पुरुषांची संख्या जास्त होती आणि फक्त  कुडमुडे जोशी यांच्याच समाजाचे नाही तर इतर देखील त्यामुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसे या सामाजिक संकटातून मार्ग काढण्यासाठी हा कायदा केला गेला आणि त्याच्या सोबत साडेसात रुपये (कलम) (घटस्फोट प्रक्रिया), ५०  (गंधर्वविवाह), ६० रुपये (कलम) (तिसरा विवाह) असे कायदे केले गेले.

सामाजिक महत्त्व

1.     ग्रामीण सोलापूर मध्ये जसे कि हिप्परगा या गावा मध्ये वास्तव्यास असणारा असो अथवा केगावमध्ये रहाणारकुडमुडे  जोशी यामध्ये अनेक व्यक्तींनी महाराष्ट्र केसरी अशा स्पर्धेसाठी निवडून गेली आहेत त्यामधील 99% लोक हे केगाव मध्ये राहतो.

2.     त्याचा बरोबर समाजातील अनेक लोक शाहिरकीचे काम करतात ज्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले जाते.