Jump to content

कुंदनिका कापडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुंदनिका कापडिया
नंदीग्राम आश्रमात, जुलै २०१८

कुंदनिका कापडिया (११ जानेवारी १९२७ - ३० एप्रिल २०२०) या गुजरातमधील भारतीय कादंबरीकार, कथा लेखक आणि निबंधकार होत्या.

चरित्र

[संपादन]

कुंदनिका कापडिया यांचा जन्म ११ जानेवारी १९२७ रोजी नरोत्तमदास कापडिया यांच्या घरी झाला. त्यांचे जन्म गाव लिंबडी (आता सुरेंद्रनगर जिल्हा, गुजरात) हे आहे. त्यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गोध्रा येथे पूर्ण केले. १९४२ मध्ये त्यांनी जुलमी ब्रिटिश राजवटीविरुद्ध सुरू झालेल्या भारत छोडो आंदोलनात भाग घेतला. इ.स. १९४८ मध्ये, त्यांनी मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या समलदास कॉलेज, भावनगरमधून इतिहास आणि राजकारणात बीए पूर्ण केले. त्यांनी मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून संपूर्ण राजकारणात एमए केले पण त्या परीक्षेला बसू शकल्या नाहीत. इ.स. १९६८ मध्ये मुंबईत गुजराती कवी मकरंद दवे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना मूलबाळ नव्हते.[] त्यांनी १९८५ मध्ये वलसाडजवळील वांकल गावाजवळ नंदीग्राम या आश्रमाची सह-स्थापना केली. त्यांना नंदीग्रामचे सहकारी ईशामा म्हणून ओळखत होते. त्यांनी यात्रिक (१९५५ - १९५७) आणि नवनीत (१९६२ - १९८०) ही मासिके संपादित केली.[][][][][][]

३० एप्रिल २०२० रोजी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील वांकल गावाजवळील नंदीग्राम येथे वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[][]

पुरस्कार

[संपादन]

कापडिया यांना गुजराती साहित्य परिषद आणि गुजरात साहित्य अकादमीकडून अनेक पारितोषिके मिळाली. चंद्र तारा वृक्ष वडल या पुस्तकासाठी गुजरात साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यांना १९८५ मध्ये सत पगला आकाशासाठी गुजराती भाषेतील साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[][] त्यांना १९८४ मध्ये धनजी कानजी गांधी सुवर्ण चंद्रक मिळाले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Gujarati author Kundanika Kapadia dies at 93". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 30 April 2020. 30 April 2020 रोजी पाहिले.
  2. ^ a b *Brahmabhatt, Prasad (2010). અર્વાચીન ગુજરાતી સાહિત્યનો ઈતિહાસ - આધુનિક અને અનુઆધુનિક યુગ (History of Modern Gujarati Literature – Modern and Postmodern Era) (गुजराती भाषेत). Ahmedabad: Parshwa Publication. pp. 252–255. ISBN 978-93-5108-247-7.
  3. ^ a b Susie J. Tharu; Ke Lalita (1993). Women Writing in India: The twentieth century. Feminist Press at CUNY. pp. 254–256. ISBN 978-1-55861-029-3.
  4. ^ a b c "Nandigram : A center for Service and Sadhana". Nandigram. 2018-09-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 December 2016 रोजी पाहिले.. Nandigram. Archived from the original Archived 2018-09-24 at the Wayback Machine. on 24 September 2018. Retrieved 28 December 2016.
  5. ^
  6. ^ Shukla, Rakeshkumar (30 April 2020). "'સાત પગલાં આકાશમાં' નામની પ્રસિદ્ધ ગુજરાતી કૃતિનાં લેખિકા કુંદનિકા કાપડિયાનું નંદીગ્રામ ખાતે નિધન". Divya Bhaskar (गुजराती भाषेत). 30 April 2020 रोजी पाहिले.
  7. ^ "Sahitya Akademi Awards". Sahitya Akademi (इंग्रजी भाषेत). 4 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 December 2016 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]