किंबर्ले, नॉदर्न केप
Jump to navigation
Jump to search
किंबर्ले हे दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठे आणि नॉर्दर्न केप प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. ऑरेंज नदी आणि वाल नदीच्या संगमाच्या पुर्वेस सुमारे ११० किमी अंतरावर हे शहर वसलेले आहे. हिर्याची खाण आणि दुसर्या बोअर युद्धावेळचा वेढा ह्यामुळे ह्या शहराला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. सेसिल ऱ्होड्स आणि बार्ने बार्नाटो सारख्या मोठ्या व्यक्तिंनी त्यांचे नशीब येथेच घडवले, आणि डि बीयर्स ह्या कंपनीची पाळेमुळे ह्याच खाण प्रदेशाच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये सापडतात.
२ सप्टेंबर १८८२ साली पायाभूत सुविधांमध्ये रस्त्यांवर विद्युत दिव्यांचा अंतर्भाव करणारे किंबर्ले हे दक्षिण गोलार्धातील पहिले तर फिलाडेल्फियानंतर जगातील दुसरे शहर आहे. आफ्रिकेतील पहिले स्टॉक एक्सचेंज किंबर्ले येथे १८८१ साली बांधले गेले. [१]