काशीचे घाट
उत्तरी भारतात उत्तरप्रदेश राज्यात गंगा नदीच्या किनारी काशी नावाचे हिंदूंसाठी पवित्र समजले जाणारे ठिकाण आहे. या काशी शहराला वाराणसी, बनारस वगैरे अनेक नावे आहेत. काशीमध्ये गंगेच्या काठी महत्त्वाचे समजले जाणारे पाच घाट आहेत, त्यांची नावे :
१. असिसंगम घाट :
२. दशाश्वमेघ घाट :
३. पंचगंगा घाट :
४. मणिकर्णिका घाट :
५. वरणासंगम घाट :
या घाटांखेरीज इतरही पन्नास-साठ घाट नदीच्या काठाने आहेत. त्यांपैकी काही असे : अग्नीश्वरघाट, अहल्यादेवीघाट, केदारघाट, गंगामहलघाट, गायघाट, चिताघाट(स्मशानघाट), चौसष्टीघाट, जानकीघाट, तुलसीघाट, त्रिलोचनघाट, दुर्गाघाट, नारदघाट, प्रल्हादघाट, ब्रह्माघाट, भोसलाघाट, महताघाट, मानससरोवरघाट, मीरघाट, मुन्शीघाट, राजघाट, राजमंदिरघाट, रामघाट, ललिताघाट, ललीघाट, लक्ष्मण-बालाघाट, लालघाट, वृक्षराजघाट, शिवालाघाट, शीतलाघाट, स्मशानघाट(चिताघाट), संकठाघाट, सिंधियाघाट, हनुमानघाट, क्षेमेश्वरघाट, इत्यादी.