काळू बाळू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तमाशासम्राट लहू संभाजी खाडे, अर्थात मराठी वगनाट्यांत गाजलेल्या काळू-बाळू जोडीतील काळू, (१६ मे, इ.स. १९३३[१][२] - ७ जुलै, इ.स. २०११; कवलापूर, सांगली जिल्हा, महाराष्ट्र) हे मराठी तमाशा कलावंत, अभिनेते व तमाशा फडाचे मालक होते. खाड्यांनी त्यांचे जुळे बंधू अंकुश संभाजी खाडे म्हणजेच बाळू यांच्यासह जहरी प्याला या वगनाट्यात काळू-बाळू नावाच्या पोलिस हवालदारांच्या जोडगोळी रंगवली होती. त्यांच्या या भूमिका महाराष्ट्रभर इतक्या गाजल्या, की ते जोडनाव या दोघा भावंडांचे टोपणनाव बनले.

जीवन[संपादन]

खाड्यांचा जन्म १६ मे, इ.स. १९३३ रोजी झाला. त्यांच्या घरी तीन पिढ्यांपासून तमाशाचा पेशा चालू होता[२]. खाड्यांनी त्यांचे जुळे बंधू अंकुश खाडे यांच्यासह ती परंपरा पुढे चालू ठेवली. जहरी प्याला या वगनाट्यामुळे काळू-बाळू या जोडीचे नाव महाराष्ट्रभर झाले. त्यांचा राम नाही राज्यात हा वगही गाजला.

काळू-बाळू जोडीला तमाशाकलेतील योगदानासाठी इ.स. १९९९-२००० सालांतील संगीत नाटक अकादमी पुरस्कार संयुक्तपणे देऊन गौरवण्यात आले [३].

वगनाट्ये[संपादन]

  • जिवंत हाडाचा सैतान
  • रक्तात रंगली दिवाळी
  • कोर्टात मला नेऊ नका
  • काळसर्पाचा विषारी विळखा
  • कथा ही दोन प्रेमिकांची
  • इंदिरा काय भानगड ?
  • रक्तात न्हाली अब्रू
  • इश्क पाखरू
  • लग्नात विघ्न
  • सत्ता द्यावी सुनेच्या हाती

आत्मकथन[संपादन]

  • काळू-बाळू या नावाने यांचे आत्मकथन २००८ साली प्रसिद्ध झाले आहे. शब्दांकन सांगली येथील सुधीर कुलकर्णी यांनी केले असून प्रकाशक शुभदा कुलकर्णी या आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. "तमाशा कलावंत काळू यांचे निधन" (मराठी मजकूर). प्रहार. ८ जुलै, इ.स. २०११. ९ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. [मृत दुवा]
  2. २.० २.१ "तमाशासम्राट लहू खाडे यांचे निधन" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स. ८ जुलै, इ.स. २०११. ९ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. 
  3. "संगीत नाटक अकादमी पुरस्कार - पुरस्कारविजेत्यांची सूची" (इंग्लिश मजकूर). संगीत नाटक अकादमीचे अधिकृत संकेतस्थळ. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १५ फेब्रुवारी २०१४ रोजी मिळविली). ९ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले.