कर्स्टन डन्स्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कर्स्टन कॅरोलाइन डन्स्ट (३० एप्रिल, १९८२:पॉइंट प्लेझंट, न्यू जर्सी, अमेरिका - ) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आहे. हिने वयाच्या सातव्या वर्षी चित्रपटांतून अभिनय करण्यास सुरुवात केली होती. ही बारा वर्षांची असताना तिला इंटरव्ह्यू विथ द व्हॅम्पायर चित्रपटातील क्लॉडियाच्या भूमिकेसाठी गोल्डन ग्लोब पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. तिने लिटल विमेन, वॅग द डॉग, स्मॉल सोल्जर्स आणि ब्रिंग इट ऑन तसेच स्पायडरमॅन चित्रपटशृंखलेमध्ये अभिनय केला आहे.