कपिला षष्ठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कपिला षष्ठी हा हिंदू पंचांगातील एक अत्यंत दुर्मीळ योग आहे. साधारण ६० वर्षांतून एकदा हा योग येतो. कपिला षष्ठी योग घडण्यासाठी खालील सहा गोष्टी आवश्यक आहेत.

  1. भाद्रपद महिना
  2. कृष्ण पक्षातील षष्ठी
  3. मंगळवार
  4. चंद्र रोहिणी नक्षत्रामध्ये
  5. सूर्य हस्त नक्षत्रामध्ये
  6. व्यतिपात योग

मागील कपिला षष्ठी योग २ ऑक्टोबर २००७ रोजी भारतात सकाळी ६:२० ते ६:५० ह्या वेळेदरम्यान आला होता.

ह्या षष्ठीचे दिवशी हस्तनक्षत्रींचा सूर्य असल्याने अतिमहाफल मिळते. ह्या कपिलाषष्ठीचा योग सूर्यपर्व आहे. शास्त्रवचनानुसार हा योग दिवसाचाच घेतात, रात्रीचा घेत नाहीत. ह्या दिवशी होम, दान वगैरे केले असतां कोटी कोटी पुण्य मिळते अशी समजूत आहे. परंतु ह्या दिवशी कधीही श्राद्ध करू नये, असे सांगितले जाते.

संदर्भ[संपादन]