Jump to content

कंकर (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Australian White Ibis
Australian White Ibis-preening

कंकर, गंडेर, पांढऱ्या बुज्या, कामरी, सफेत कुडावळ, काकणघार, खारी बलई, खुबळ, पांढरा अवाक, सफेत खुबळ (इंग्लिश: White Ibis) हा एक पक्षी आहे.

याला हिंदी मध्ये कचाटोर,दिढर मुंड,मुंडा,मुंडूख,सफेद बाज,सफेद बुज्जा असे म्हणतात.

याला गुजरातीमध्ये धोली कांकणसार असे म्हणतात.

याला तेलगुमध्ये तेल्ल कंकणम असे म्हणतात.

ओळख

आकाराने कोंबडीपेक्षा मोठा असतो.पाणथळीतील पांढरा पक्षी.डोके व मान काळी.त्यांवर पिसे नसतात.कोरलच्या चोचीप्रमाणे खाली वाकलेली चोच.विणीच्या हंगामात पाठ व पंख काळपट करडे.मानेच्या बुडाशी सुंदर,सुबक पिसे. नर-मादी दिसायला सारखेच असतात.

वितरण

भारत,नेपाळ आणि श्रीलंका या भागांत निवासी आणि भटके


निवासस्थाने

दलदली आणि सरोवर

कंकरचे प्रकार

[संपादन]

१)काळा कंकर

[संपादन]
Pseudibis papillosa 2

काळा कंकर या पक्षाला इंग्रजीमध्ये Indian Blak Ibis या पक्षाला मराठीमध्ये कामऱ्या कंकर,काळा कंकर,काळा गंडेर,ढोकरू,मोरकुंच,लहान कामऱ्या,कामरी,काकणघार,काळी कुडावळ,कुडवळ,काळा अवाक,भारवेल असे म्हणतात. या पक्षाला हिंदीमध्ये कडाकुल,करंकुल,काला बाज,काला बुज्जा,बाज असे म्हणतात. या पक्षाला गुजरातीमध्ये काली कांकणसार असे म्हणतात. या पक्षाला तेलगुमध्ये नल्ल कंकणम असे म्हणतात.

ओळखण:

मध्यम आकाराच्या कोंबडीएवढा कोरलच्या चोचीप्रमाणे बाकदार चोच.खांद्यावर ठळक पांढरा डाग.विटकरी तांबड्या रंगाचे पाय.पिसे नसलेले काळे डोके.डोक्यावर तिकोनी आकाराचा किरमिजी चामखीळवजा तुरा.नर-मादी दिसायला सारखेच असतात.

वितरण

निवासी पाकिस्तान,गुजरात,राजस्थान,ब्रम्हदेशापर्यंत.

निवासस्थाने

सरोवरे,नद्या,दलदली आणि भातशेती.

२)चिमणा कंकर

[संपादन]
Glossy Ibis RWD
Glossy

चिमणा कंकर या पक्षाला इंग्रजीमध्ये Glossy Ibis असे म्हणतात. या पक्षाला मराठीमध्ये चिमणा कंकर असे म्हणतात. या पक्षाला हिंदीमध्ये कोवर,कोवारी,छोटा बाज,छोटा बुज्जा असे म्हणतात. या पक्षाला गुजरातीमध्ये पान कांकणसार असे म्हणतात. या पक्षाला तेलगुमध्ये ताट कंकणम असे म्हणतात.

ओळखण:


मध्यम आकाराच्या कोंबडीएवढा दुरून काळा दिसत असला तरी अगदी जवळून निरीक्षण केल्यास हिरव्या आणि तांबूस रंगाची झाक पंखावर दिसते.बाकदार चोच.पाय काळे.खांद्यावर पांढरी पट्टी असते.

वितरण

पाकिस्तान,बांगला देश,उत्तर प्रदेश,नेपाळ,गुजरात,ओरिसा,आसाम आणि मणिपूर रशियातील व्होल्गा डेल्टा येथे.

निवासस्थाने

दलदली आणि सरोवरे.

संदर्भ

[संपादन]
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली