ओरिएंट एक्सप्रेस
Appearance
ओरिएंट एक्सप्रेस ही एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपासूनची युरोपमधील रेल्वेसेवा होती. कंपनी इंटरनॅशनाल दे वागन्स-लिट्स या कंपनी द्वारे सुरू झालेली ही रेल्वे सेवा प्रवाशांची लंडन आणि पॅरिस पासून अॅथेन्स आणि इस्तंबूल पर्यंत ने-आण करीत असे. ही सेवा २००९ मध्ये बंद पडली.
या सेवेचा मार्ग अनेक वेळा बदलला असला तरीही ओरिएंट एक्सप्रेस हे नाव वैभवशाली रेल्वे प्रवासाशी निगडीत आहे.
सुरुवातीस पॅरिस ते इस्तंबूल हा मार्ग १९७७मध्ये पॅरिस ते बुखारेस्ट व १९९१ मध्ये बुडापेस्ट मध्ये संंपत असे. २००१ मध्ये हे सेवा व्हियेनामध्येच थांबत असे. २००७ मध्ये हा मार्ग स्ट्रासबुर्ग ते बुडापेस्ट असा होता. १४ डिसेंबर, २००९ रोजी या मार्गावरील शेवटची फेरी धावली.
अगाथा क्रिस्टीची मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस ही कादंबरी प्रसिद्ध आहे. या कादंबरीवरून अनेक चित्रपटही केले गेले.