ओमिक्रॉन कोरोना विषाणू
ओमिक्रॉन (ओमायक्रॉन) कोरोना विषाणू हा सार्स-कोव्ह-२ (कोरोना) विषाणूचा एक प्रकार आहे, ज्यामुळे कोव्हीड -१९ होतो. डिसेंबर २०२१ पर्यंत, हा कोरोना विषाणूचा सर्वात नवीन प्रकार आहे. पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेने २४ नोव्हेंबर २०२१ रोजी जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) याची कलपना दिली.[१] २६ नोव्हेंबर २०२१ रोजी, जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूला एक चिंतेचा प्रकार म्हणून सांगितले आणि त्याला "ओमिक्रॉन" असे नाव दिले, ओमिक्रॉन हे ग्रीक वर्णमालेतील पंधरावे अक्षर आहे.[२]
या विषाणू प्रकारामध्ये असामान्यपणे मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तने आहेत, ज्यापैकी अनेक हे नवीन आहेत[३] आणि त्यातील बरेच हे कोव्हीड - १९ लसींद्वारे लक्ष्यित केलेल्या स्पाइक प्रोटीनवर परिणाम करतात. या बदलामुळे त्याची संक्रमणक्षमता, रोगप्रतिकारक शक्ती आणि लस प्रतिरोधकतेबाबत चिंता निर्माण झाली आहे, जरी प्रारंभिक अहवाल असे दर्शवितात की या प्रकारामुळे पूर्वीच्या प्रकारापेक्षा कमी गंभीर रोग होतात. या प्रकाराला त्वरित "गंभीर प्रकार" म्हणून वर्गीकृत केले गेले आणि त्याचा आंतरराष्ट्रीय प्रसार कमी करण्यासाठी अनेक देशांनी प्रवास निर्बंध लागू केले.
गंभीर प्रकारच्या मागील प्रकारांच्या तुलनेत, ओमिक्रॉन हे जास्त सांसर्गिक (खूप लवकर पसरणारे) असल्याचे मानले जाते,[४] आणि फुफ्फुसाच्या वायुमार्गामधे कोणत्याही मागील प्रकारांपेक्षा सुमारे ७० पट वेगाने पसरते, परंतु ते खोलवर प्रवेश करण्यास कमी सक्षम आहे आणि कदाचित या कारणामळे गंभीर आजाराच्या जोखमीमध्ये रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकतेत लक्षणीय घट होईल.[५] तरीही, दुहेरी लसीकरण आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती या दोन्हीपासून बचाव करण्याच्या क्षमतेसह, प्रसाराचा अत्यंत उच्च दर, म्हणजे कोणत्याही वेळी रुग्णालयात उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांची एकूण संख्या अजूनही चिंतेचा विषय आहे.
११-१६ नोव्हेंबर रोजी गोळा केलेल्या नमुन्यांच्या आधारे बोत्सवाना आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रयोगशाळांमध्ये २२ नोव्हेंबर २०२१ रोजी हा नवीन प्रकार प्रथम आढळला.[६] पहिला ज्ञात नमुना ८ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत गोळा करण्यात आला. इतर खंडांमध्ये, पहिली ज्ञात प्रकरणे ११ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून हाँगकाँगमध्ये कतार मार्गे आलेली एक व्यक्ती होती आणि त्याच तारखेला इजिप्तहून तुर्कीमार्गे बेल्जियममध्ये आलेली दुसरी व्यक्ती होती.[७][८] १६ डिसेंबर २०२१ पर्यंत, ८० पेक्षा जास्त देशांमध्ये या प्रकाराची पुष्टी झाली आहे.[९] जागतिक आरोग्य संघटनेनुसार डिसेंबरच्या मध्यापर्यंत, ओमिक्रॉन बहुतेक देशांमध्ये असण्याची शक्यता आहे, मग तेथे रुग्ण सापडु किंवा नाही.[१०]
नामकरण
[संपादन]२६ नोव्हेंबर रोजी, जागतिक आरोग्य संघटनेच्या सार्स-कोव्ह-२ (कोरोना) विषाणू उत्क्रांतीवरील तांत्रिक सल्लागार गटाने B.१.१.५२९ हा गंभीर प्रकार म्हणून घोषित केले आणि त्याला ग्रीक अक्षर ओमिक्रॉनने नामकरण केले. सार्स-कोव्ह-२ (कोरोना) विषाणूचे प्रकार संबोधित करण्सायाठी ग्रीक अक्षरे वापरली जातात. जागतिक आरोग्य संघटनेने इंग्रजी शब्द "न्यु - new" आणि चीनी आडनाव "शी - xi" मधील समानतेचा गोंधळ टाळण्यासाठी ग्रीक वर्णमालेतील न्यु (nu) आणि शी (xi) ही अक्षरे वगळली. पूर्वीचा प्रकार हा म्यु (mu) होता.[११][१२][१३]
चिन्हे आणि लक्षणे
[संपादन]सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने डिसेंबरच्या १ ते ७ डिसेंबर दरम्यान केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की "सर्वात सामान्यपणे नोंदवलेली लक्षणे [होते] खोकला, थकवा, आणि नाक बंद होणे किंवा नाक वाहणे".[१४]
२५ डिसेंबर २०२१ रोजी लंडनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात झो कोविड ॲपच्या
वापरकर्त्यांनी सांगितलेली सर्वात जास्त लक्षणे म्हणजे "नाक वाहणे, डोकेदुखी, थकवा, शिंका येणे आणि घसा खवखवणे."[१५]
ओमिक्रॉन प्रकाराचे एक अद्वितीय नोंदवलेले लक्षण म्हणजे रात्रीचा घाम येणे.[१६]
निदान
[संपादन]प्रतिबंधात्मक उपाय
[संपादन]इतर प्रकारांप्रमाणेच, जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केली आहे की लोकांनी बंदिस्त जागा हवेशीर ठेवाव्यात, गर्दी टाळावी आणि जवळचा संपर्क टाळावा, योग्य मास्क घालावेत, हात वारंवार स्वच्छ करावेत आणि लसीकरण करावे.
उपचार
[संपादन]रुग्ण संख्या
[संपादन]- ^ "Classification of Omicron (B.1.1.529): SARS-CoV-2 Variant of Concern". www.who.int (इंग्रजी भाषेत). 2022-01-03 रोजी पाहिले.
- ^ Parekh, Marcus; Platt, Poppie; Team, Global Health Security; Barnes, Joe (2021-11-26). "Coronavirus latest news: EU suspends all flights to southern Africa over omicron Covid variant fears" (इंग्रजी भाषेत). ISSN 0307-1235.
- ^ Torjesen, Ingrid (2021-11-29). "Covid-19: Omicron may be more transmissible than other variants and partly resistant to existing vaccines, scientists fear". BMJ (इंग्रजी भाषेत). 375: n2943. doi:10.1136/bmj.n2943. ISSN 1756-1833. PMID 34845008 Check
|pmid=
value (सहाय्य). - ^ "Omicron: Good news, bad news and what it all means" (इंग्रजी भाषेत). 2021-12-24.
- ^ Dec 15, Lisa Schnirring | News Editor | CIDRAP News |; 2021. "Lung tissue study sheds light on fast Omicron spread". CIDRAP (इंग्रजी भाषेत). 2022-01-03 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ AfricaNews (2021-12-09CET17:02:16+01:00). "Inside the South African lab that discovered Omicron". Africanews (इंग्रजी भाषेत). 2022-01-03 रोजी पाहिले.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ https://www.tijd.be/dossiers/coronavirus/wat-weten-we-al-over-de-nieuwe-coronavariant-de-omikron/10349264.html. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ "COVID-19: How the spread of Omicron went from patient zero to all around the globe". Sky News (इंग्रजी भाषेत). 2022-01-03 रोजी पाहिले.
- ^ "Enhancing Readiness for Omicron (B.1.1.529): Technical Brief and Priority Actions for Member States". www.who.int (इंग्रजी भाषेत). 2022-01-03 रोजी पाहिले.
- ^ "Omicron Probably In Most Countries, Spreading At Unprecedented Rate: WHO". NDTV.com. 2022-01-03 रोजी पाहिले.
- ^ "What's Omicron? Here's what we know and don't know about the new COVID variant that's roiling markets and air travel". Fortune (इंग्रजी भाषेत). 2022-01-03 रोजी पाहिले.
- ^ "Tracking SARS-CoV-2 variants". www.who.int (इंग्रजी भाषेत). 2022-01-03 रोजी पाहिले.
- ^ "Countries are scrambling to stop a new covid variant". 2021-11-26. ISSN 0013-0613.
- ^ "Update on Omicron". www.who.int (इंग्रजी भाषेत). 2022-01-03 रोजी पाहिले.
- ^ CDCMMWR (2021). "SARS-CoV-2 B.1.1.529 (Omicron) Variant — United States, December 1–8, 2021". MMWR. Morbidity and Mortality Weekly Report (इंग्रजी भाषेत). 70. doi:10.15585/mmwr.mm7050e1. ISSN 0149-2195.
- ^ Scribner, Herb (2021-12-21). "Doctor reveals new nightly omicron variant symptom". Deseret News (इंग्रजी भाषेत). 2022-01-03 रोजी पाहिले.