Jump to content

ऑस्ट्रेलिया पर्यटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नोव्हेंबर ते एप्रिल हा काळ दक्षिण भागात फिरायला उत्तम असतो. नंतर जरा थंडी पडते. उत्तर भागात मात्र पावसाळा सोडून सगळाच काळ बरा असतो फिरायला. वेगवेगळ्या प्रकारच्या माशा मात्र खूप असतात उन्हाळ्यात.

फिरायला येणे - ऑस्ट्रेलियाला फिरायला येण्यासाठी अर्जानुसार ३ महिने ते १ वर्ष पर्यंतचा व्हिसा मिळतो. हा व्हिसा साधारणपणे एका आठवड्याच्या कालावधीत मिळून जातो. मात्र या व्हिसावर परमनंट रेसिडेंट-ऑस्ट्रेलिया हा व्हिसा मिळेलच असे नाही.

व्यवसाय व्हिसा - हा ५ वर्षांसाठी मिळतो. मात्र या व्हिसावर परमनंट रेसिडेंट-ऑस्ट्रेलिया हा व्हिसा मिळेलच असे नाही.

शैक्षणिक व्हिसा - या व्हिसावर शिक्षणासाठी येण्याचा व्हिसा मिळतो. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर परतणे आवश्यक आहे. शिक्षण जर योग्य त्या श्रेणीत बसणारे असेल, जसे शेफ, मोटार मॅकॅनिक, अकाऊंटंट इत्यादी तर पुढे परमनंट रेसिडेंट-ऑस्ट्रेलिया हा व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करता येतो.

सर्व प्रकारच्या व्हिसा साठी ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांच्या कार्यालयाशी (ऑस्ट्रेलियन हाय कमिशन इंग्रजी: Australian High Commission) संपर्क साधणे आवश्यक आहे. ही कार्यालये मुंबईनवी दिल्ली येथे आहेत. राजदूतांच्या कार्यालयाविषयी अधिक माहिती त्यांच्या संकेतस्थळावर मिळेल. ऑस्ट्रेलियन हाय कमिशन

ऑस्ट्रेलियाला कायमचे अथवा नोकरी विषयक देशांतर करता येते. अधिक माहितीसाठी येण्यासाठी ऑस्ट्रेलियाला देशांतर हे पान पहा.