Jump to content

ऑर्थर कॉनन डॉयल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सर आर्थर कॉनन डॉयल
जन्म नाव आर्थर इग्नेशियस कॉनन डॉयल
जन्म २२ मे १८५९
एडिनबरो, स्कॉटलंड
मृत्यू ७ जुलै १९३०
क्रोबरो, ईस्ट ससेक्स, इंग्लंड
राष्ट्रीयत्व स्कॉटिश
कार्यक्षेत्र साहित्यिक, डॉक्टर
भाषा इंग्लिश
साहित्य प्रकार हेरकथा, ऐतिहासिक कादंबरी, ललितेतर साहित्य
प्रभाव एडगर ॲलन पो
प्रभावित ॲगाथा ख्रिस्ती आणि इतर हेरकथाकार
स्वाक्षरी ऑर्थर कॉनन डॉयल ह्यांची स्वाक्षरी

सर आर्थर इग्नेशियस कॉनन डॉयल (इंग्लिश: Arthur Ignatius Conan Doyle, जन्म : एडिनबरो-स्कॉटलंड, २२ मे १८५९; - क्रोबरो, ईस्ट ससेक्स, इंग्लंड, ७ जुलै १९३०) हा स्कॉटिश लेखक होता. त्याने इंग्लिश भाषेत रहस्यकथा, विज्ञानकथा, कादंबऱ्या व कविता लिहिल्या. त्याने लिहिलेल्या शेरलॉक होम्स या काल्पनिक सत्यान्वेषी पात्राच्या रहस्यकथा लोकप्रिय असून गुन्हेगारीविषयक इंग्लिश साहित्यातील मानदंड मानल्या जातात.

सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या ’शेरलॉक होम्स’ कथांची मराठीत अनेक भाषांतरे झाली आहेत. त्यांतली काही अशी (कंसात अनुवादकार) : -

  • संपूर्ण शेरलॉक होम्स (गजानन क्षीरसागर)
  • शेरलॉक होम्सच्या कर्तृत्त्व कथा (जैको प्रकाशन)
  • शेरलॉक होम्सच्या साहसी कथा (जैको प्रकाशन)
  • शेरलॉक होम्सच्या अखेरच्या काही साहसी कथा (जैको प्रकाशन)
  • शेरलॉक होम्सः सुपर-ब्रेन (पंढरीनाथ सावंत)-"द हाउंड ऑफ दि बास्करव्हिल्स" व "द व्हॅली ऑफ फिअर" या दोन कादंबऱ्या.
  • द साईन ऑफ फोर (कादंबरी) (प्रवीण जोशी)
  • द व्हॅली ऑफ फिअर (कादंबरी) (प्रवीण जोशी)
  • द हाउंड ऑफ दि बास्करव्हिल्स (प्रवीण जोशी)
  • शेरलॉक होम्सच्या पाच कथा (बिंबा केळकर) - द डिसॲपिरन्स ऑफ लेडी फ्रँन्सिस कार फॅक्स (काळ आला होता पण...), द ॲडव्हेंचर ऑफ ब्लॅक पीटर (काळोखातले कृष्णकृत्य), द ॲडव्हेंचर्स ऑफ द डेव्हिल्स फूट (सैतानी पाऊल) आणि द प्रॉब्लेम अँड थॉर ब्रिज (थॉर ब्रिजवरचे सूडनाट्य).
  • शाबास, शेरलॉक होम्स! (भा.रा. भागवत) - पाच पुस्तके
  • शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा भाग १ ते ६ (भालबा केळकर)
  • साहसी शेरलॉक होम्स (संजय कप्तान)


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
विकिक्वोट
विकिक्वोट
ऑर्थर कॉनन डॉयल हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.