शेरलॉक होम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शेरलॉक होम्स
Sherlock Holmes Portrait Paget.jpg
सिडनी पेजेट याने रेखलेले इ.स. १९०४ मधील कल्पनाचित्र
कार्यकाल इ.स. १८७७ - इ.स. १९१४
लेखक सर आर्थर कॉनन डॉयल
माहिती
सहकारी डॉ. वॉटसन
व्यवसाय सत्यान्वेषी
कुटुंब मायक्रॉफ्ट होम्स (मोठा भाऊ)
राष्ट्रीयत्व इंग्लंड
तळटिपा


शेरलॉक होम्स (इंग्लिश: Sherlock Holmes) हे स्कॉटिश लेखक सर आर्थर कॉनन डॉय्ल यांनी लिहिलेयला कथानकांमधील नायकाचे नाव आहे. होम्स हे पेश्याने सत्यान्वेशी (डीटेकटीव) आहेत. अविश्वसनीय चातुर्य असलेले होम्स इंग्लंड मधील लंडन शहरात राहात असून, आधुनिक वीज्ञान, रसायन शास्त्र आणि सूक्ष्म निरीक्षणाचे वापर करून अनेक अवघड गुन्हाप्रकरणी सोडवत असे.

१८८७ मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झालेल्या होम्सवर डॉय्ल यांनी ४ कादंबर्या आणि ५६ लघु-कथा लिहिल्या. “अ स्टडी इन स्कार्लेट” ही पहिली कादंबरी “बीटनझ् ख्रिस्मस अँन्यूअल” नावाच्या मासिकेत १८८७ या वर्षी प्रकाशित झाली. दुसरी कादंबरी “द साइन ऑफ फोर”, “लिप्पिनकॉटस् मंथली मॅगझीन” या मासिकेत १८९० वर्षी प्रकाशित झाली. या नंतर १८९१ ते १९२७ पर्यंत “द स्ट्रँड मॅगझीन” मध्ये प्रकाशित झालेल्या लघुकथांमधून होम्स या पत्राला वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. कथानकातील घटना १८८० ते १९१४ या कालावधीत घडतात.

डॉय्ल यांनी या कथा, होम्स चे साथी आणि चरित्रकार डॉक्टर जॉन एच. वॉटसन हे कथन करीत असल्याच्या पद्धतीने लिहिल्या आहेत. एकूण कथांपैकी केवळ ४ वगळून बाकी सर्व कथांचे कथन डॉ. वॉटसन करतात. राहिलेल्या ४ पैकी २ चे कथन स्वतः होम्स करतात आणि २ कथा तृतिय-पुरुष दृष्टीकोणातून सांगितल्या गेल्या आहेत.

पात्ररचनेमागील प्रेरणा[संपादन]

शेरलॉक होम्स या काल्पनिक पात्रामागील प्रेरणास्रोत हे डॉ. जोसेफ बेल हे आहेत, असे डॉयल यांनी नमूद केले आहे. डॉयलनी जोसेफ बेल यांच्या एडिनबर्ग रॉयल इन्फर्मरी या संस्थेत कारकुनी केली होती. होम्सप्रमाणेच बेलसुद्धा अगदी साध्या निरीक्षणांतून मोठ्या निष्कर्षांपर्यंत पोहोचत असे. रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स या महाविद्यालयामधील व्याख्याते सर हेन्‍री लिटलजॉन हेसुद्धा होम्सच्या पात्रामागची प्रेरणा आहेत असे मानले जाते. त्यांनी पोलिस सर्जन आणि वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले होते. या दोघांमुळे सर आर्थर यांना वैद्यकीय तपासणी आणि सूक्ष्म निरीक्षणे यांची जोड गुन्हे अन्वेषणासाठी मदतरूप झाली.

वैयक्तिक जीवन[संपादन]

Magazine cover featuring A Study in Scarlet, with drawing of a man lighting a lamp
१८८७ मध्ये प्रथम प्रकाशित कथा 'अ स्टडी इन स्कार्लेट'

डॉय्ल यांनी लिहिलेल्या कथांमध्ये होम्सच्या वैयक्तिक जीवनाबाद्धाल अथवा नातेवाईकांबद्दल खूप कमी माहिती मिळते. “हिस लास्ट बाव” या कथेतील घटना १९१४ मध्ये घडतात. या कथेमध्ये होम्सचे वय ६० वर्ष असल्याचे सांगितले गेले आहे. यावरून होम्सचे जन्म १८५४ मध्ये झाल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. “द न्यू अॅन्नोटेटेड शेरलॉक होम्स” चे लेखक लेस्ली क्लीन्गर यांनी होम्स ची जन्मतारीख ६ जानेवारी असल्याचे म्हटले आहे.

सूक्ष्म निरीक्षण आणि त्यातून करण्याचे निश्कर्षण यांचा अभ्यास पदवीपूर्व काळातच चालू केल्याचे होम्स सांगतात. त्यांनी केलेली सुरुवातीची अन्वेषणे ही त्यांच्याच बरोबर शिकत असलेल्या सोबती विद्यार्थ्यांसाठी केल्याचे कळते. होम्स सुट्टी साठी एका मित्राच्या घरी गेलेले असताना, त्या मित्राचे वडील होम्स चे निरीक्षणकौशल्य पाहून त्यांना सत्यान्वेशी होण्याचा सल्ला देतात. शिक्षण पूर्ण केल्यावर ६ वर्षे होम्स गुन्हे अन्वेषणाचे काम करतात. त्यानंतर आर्थिक तणावामुळे घरभाडे एकट्याने परवडत नसल्यामुळे ते डॉ. वॉटसन यांच्याबरोबर २२१ बी. बेकर स्ट्रीट या पत्त्यावर घर भाड्याने घेतात व तेथे राहू लागतात. एकत्र राहू लागल्यानंतर डॉ. वॉटसन होम्सच्या अन्वेषणकार्यामध्ये रुची घेऊ लागतात आणि त्यांच्या कामात त्यांची मदत करू लागतात. २२१ बी. बेकर स्ट्रीट येथील त्यांचे वास्तव्य १८८१ वर्षापासून झाल्याचे कळते. २२१बी हे घर “बेकर स्ट्रीट” या रस्त्याच्या सुरुवातीलाच असून, घराच्या पहिल्या मजल्यावर होम्सची खोली असत. घराच्या दुसर्या मजल्यावर डॉ. वॉटसन यांची खोली असत.

डॉ. वॉटसनशी ओळख व्हायच्या अगोदर होम्स एकटेच काम करत असत. क्वचित प्रसंगी ते काही विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी रस्तावरील उनाड मुलांची मदत घेत असत. या उनाड मुलांच्या टोळीला “द बेकर स्ट्रीट इर्रेग्युलर्स” असे नाव त्यांनी ठेवले होते. “द बेकर स्ट्रीट इर्रेग्युलर्स”चा उल्लेख ३ कथांमध्ये होतो: “अ स्टडी इन स्कार्लेट”, “द साइन ऑफ फोर” आणि “द अॅडवेन्चर ऑफ द क्रूकेड मॅन”

होम्सच्या पालकांचा उल्लेख कुठल्याही कथेत नाही, मात्र त्यांचे पूर्वज धनिक जमीनदार असल्याचे स्वतः होम्स एका प्रसंगी सांगतात. “द अॅडवेन्चर ऑफ द ग्रीक इंटरप्रीटर” या कथेमध्ये ते हॉरेस वेर्ने नावाच्या आपल्या फ्रेंच काकांचा उल्लेख करतात. ७ वर्षांनी मोठे असलेले होम्सचे वडील बंधू मायक्रोफ्ट होम्स यांची ३ कथानाकांमध्ये महत्वाची भूमिका असून एका कथे मध्ये त्यांचा नुसता उल्लेख आहे. मायक्रोफ्ट होम्स हे ब्रिटीश सरकारमध्ये एका महत्वाच्या पदावर असत. अनेक सरकारी विभागांसंदर्भातील बरीच महत्वाची माहिती लाक्षत ठेवून ती योग्य ठिकाणी आणि प्रसंगी वापरण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असत. सूक्ष्म निरीक्षण आणि निश्कर्षण याची कला त्यांच्यापेक्षाही त्यांच्या बंधूंमध्ये कित्येक पटीने अधिक असल्याचे होम्स डॉ. वॉटसन यांना सांगतात. पण स्वभावानी आळशी असल्यामुळे थोरले होम्स आपला बराचसा वेळ त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी प्रस्थापित केलेल्या एका क्लब - “डायोजीनिझ क्लब” - मध्ये घालवत असत.

डॉ. वॉटसन बरोबरचा काळ[संपादन]

Holmes (in deerstalker hat) talking to Watson (in a bowler hat) in a railway compartment
सिडनी पॅजेट यांनी बनवलेल्या ‘सिल्वर ब्लेझ’ या कथेमधील एका चित्रात होम्स आणि डॉ. वॉटसन

होम्सनी एकूण २३ वर्षे अन्वेषणाचे कार्य केले ज्यापैकी १७ वर्षे डॉ. वॉटसन त्यांच्या सोबत होते. १८८७ मध्ये डॉ. वॉटसनच्या लग्नाआधी आणि पुढे त्यांचा पत्नीच्या निधनानंतर ते एकत्र राहत होते. २२१ बी. बेकर स्ट्रीट येथील त्यांच्या घराच्या मालकिणीचे नाव मिसेस हडसन होते. त्याच त्यांची घरगुती कामे व घराची देखरेखही करत.

बर्च्याचशा कथा डॉ. वॉटसन अन्वेषणाचा सारांश करत असल्याच्या पद्धतीने लिहिल्यागेल्या आहेत. होल्म्स अनेकदा डॉ. वॉटसनच्या सरांशिक लिखाणाची तीव्र टीका करत. त्यांचे म्हणणे असे की डॉ. वॉटसन सारांश लिहितांना मूळ अन्वेषणापेक्षा संबंधित लोकांच्या मनस्थिती आणि भावनांवर आणि घटनांच्या रंगीत चित्रणावर जास्त भर देत. त्यामुळे त्या सरांशाचे मुख्य बिंदू निश्कर्षण-विज्ञान नसून व्यक्तिरेखा आणि घटना वर्णन असे.

लिखाणासंदर्भात दुमत असूनही त्यांच्यातील मैत्री घनिष्ट असे. एका प्रसंगी डॉ. वॉटसन यांना बंदुकाची गोळी लागते. अखेरीस जखम सौम्यच असल्याचे कळते पण आपल्याला गोळी लागल्यामुळे झालेली होम्स ची तडफड पाहून डॉ. वॉटसनचे मन भरून येते. होम्सची भावनाशून्य स्वभावाची सवय असलेल्या डॉ. वॉटसनना त्यांची अशी प्रतिक्रिया पाहून सुखद धक्का बसतो.


द ग्रेट हायॅटस – होम्सच्या जीवनातील अदृश्य खंड[संपादन]

Holmes and Moriarty wrestling at the end of a narrow path, with Holmes's hat falling into a waterfall
रायखेनबाख फॉल्स जवळ झालेली होम्स आणि मॉरियार्टी यांच्यात झटापट. चित्रकार: सिडनी पॅजेट

१० वर्षे होम्सच्या कथा रेखाटल्यानंतर, आपल्या इतिहासविषयक लिखाणावर लक्ष केंद्रित करण्याच्या हेतूने डॉय्ल यांनी १८९३ मध्ये प्रकाशित कथा “द फायनल प्रॉब्लम” मध्ये होम्सच्या पात्राचा अंत केला. या कथेतील घटना १८९१ च्या वर्षात घडतात. “रायखेनबाख फॉल्स” येथे प्रोफेसर मॉरियार्टी बरोबरच्या सामन्यात पाय घसरून दरीत पडल्यामुळे होम्स आणि मॉरियार्टी दोघांचा मृत्यू होतो. होम्सच्या चाहत्यांनी त्यांच्या मृत्यू स्वीकार नाही केला आणि ते डॉय्लकडे होम्सच्या कथा पुन्हा लिहिण्यास सुरु करण्याचा आग्रह करत राहिले. ८ वर्षे या आग्रहाचा प्रतिकार केल्यानंतर १९०१ मध्ये त्यांनी “द हाउंड ऑफ बॅस्करविल” ही कादंबरी प्रकाशित केली. या कादंबरीतील घटना होम्सच्या मृत्यूपूर्व काळात घडतात. १९०३ मध्ये प्रकाशित (आणि १८९४ मध्ये घटीत) कथा “द अॅडवेन्चर ऑफ द एमटी हाउझ” मध्ये डॉय्ल यांनी होम्सला अखेर पुनः जीवित केलं. मानसिक संघर्षानंतर होम्सच्या मृत्यूचा स्वीकार केलेल्या डॉ. वॉटसनला होम्सला जिवंत बघून धक्का बसतो. आपल्या शत्रूंना चुकवण्यासाठी मारण्याचा ढोंग केल्याचं होम्स डॉ. वॉटसनला सांगतात. होम्सवर आधारित कथांचा दुसरा पर्व या कथेनी सुरु होतो. दुसरा आणि शेवटचा हा पर्व १९२७ पर्यंत चालला.

पहिल्या आणि दुसर्या पर्वांमधील काळ (१८९१ ते १८९४) – म्हणजेच “द फायनल प्रॉब्लम” मधील त्यांच्या मृत्यू पासून “द अॅडवेन्चर ऑफ द एमटी हाउझ” मधील त्यांच्या परातीपार्यंतच्या काळाला होम्सच्या चाहत्यांनी “द ग्रेट हायॅटस” – म्हणजेच होम्सच्या अदृषतेचा काळ - असे नाव दिले आहे. “द ग्रेट हायॅटस” या वाक्प्रचारचा सर्वात पहिला वापर एडगर स्मिथ यांनी जुलै १९४६ मध्ये प्रकाशित त्यांचा लेख “शेरलॉक होम्स अॅन्ड द ग्रेट हायॅटस” यात केला. हा लेख “बेकर स्ट्रीट जर्नल” या मालिकेत प्रकाशित झाला होता. १९०८ मध्ये प्रकाशित कथा “द अॅडवेन्चर ऑफ वीस्टीरिया लॉज” मधील घटना १८९२ या वर्षी घडल्याचे वर्णन डॉय्ल यांनी चुकुन केल्याचे आढळते.


निवृत्ती[संपादन]

“हिझ लास्ट बाव” कथेमध्ये होम्स आपल्या कामातून निवृत्ती घेऊन “सस्सेक्स डाउनस” भागात राहण्यास गेल्याचे कळते. तिथे त्यांनी मधमाश्या पाळण्याचे काम हाती घेतल्याचेही कळते. या विषयावर ते एक पुस्तकही प्रकाशित करतात. या कथेमध्ये होम्स आणि डॉ. वॉटसन काही काळासाठी आपल्या निवृत्त जीवनाचा त्याग करून, पहिल्या विश्व युद्धात हाथभार देण्यास काही अन्वेषणे करतात. “हिझ लास्ट बाव” व्यतिरिक्त “द अॅडवेन्चर ऑफ द लायन्स मेन” ही एकच कथा होम्सच्या निवृत्ती पाश्च्यात घडते. होम्सच्या मृत्यू बद्दल कुठलीच माहिती आढळत नाही.


मराठी भाषांतरे[संपादन]

सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या ’शेरलॉक होम्स’ कथांची मराठीत अनेक भाषांतरे झाली आहेत. त्यांतली काही अशी : -

 • द व्हॅली ऑफ फियर (कादंबरी)(प्रवीण जोशी)
 • शाबास, शेरलॉक होम्स! (भा.रा. भागवत) - पाच पुस्तके
 • शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा भाग १ ते ६ (भालबा केळकर)
 • शेरलॉक होम्स : द हाउंड ऑफ दि बास्करव्हिल्स (प्रवीण जोशी)
 • शेरलॉक होम्सच्या अखेरच्या काही साहसी कथा (जैको प्रकाशन)
 • शेरलॉक होम्सच्या कर्तृत्व कथा (जैको प्रकाशन)
 • शेरलॉक होम्सच्या पाच कथा (बिंबा केळकर) - द ॲडव्हेंचर्स ऑफ चार्ल्स ऑगस्टस मिलव्हर्टन (घात आणि आघात), द डिसॲपिरन्स ऑफ लेडी फ्रॅन्सिस कार फॅक्स (काळ आला होता पण...), द ॲडव्हेंचर ऑफ ब्लॅक पीटर (काळोखातले कृष्णकृत्य), द ॲडव्हेंचर्स ऑफ द डेव्हिल्स फूट (सैतानी पाऊल) आणि द प्रॉब्लेम ॲन्ड थॉर ब्रिज (थॉर ब्रिजवरचे सूडनाटय)
 • शेरलॉक होम्सच्या साहसी कथा (जैको प्रकाशन)
 • शेरलॉक होम्सः सुपर-ब्रेन (पंढरीनाथ सावंत)-"द हाउंड ऑफ दि बास्करव्हिल्स" व "द व्हॅली ऑफ फिअर" या दोन कादंबऱ्या
 • संपूर्ण शेरलॉक होम्स (गजानन क्षीरसागर)
 • साहसी शेरलॉक होम्स (संजय कप्तान)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.