आंदिमुथू राजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ए. राजा या पानावरून पुनर्निर्देशित)

आंदिमुथू राजा (मे १०, इ.स. १९६३) हे भारतीय राजकारणी आहेत. ते द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६,इ.स. १९९९,इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील पेरांबालूर लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातीलच निलगिरीस लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. मनमोहनसिंग सरकारमध्ये ते मे इ.स. २००४ ते मे इ.स. २००७ या काळात पर्यावरणमंत्रीहोते तर मे इ.स. २००७ पासून ते दूरसंचारमंत्री होते.

टू जी स्पेक्ट्रम लिलाव व परवाने वाटपातील कोट्यवधी रूपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपाखाली ११ फेब्रुवारी २०११ रोजी त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली. दूरसंचार मंत्रिपदाचा गैरवापर करून निवडक खासगी कंपन्यांना लाभ मिळवून देणे असे आरोप राजा वरती आहेत.[१] या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यासंदर्भात एकूण तीन खटले सुरू आहेत. त्यापैकी दोन सीबीआयच्या कोर्टात, तर तिसरा अंमलबजावणी संचलनालयाकडे आहे. या प्रकरणातील पहिल्या खटल्याचा निकाल २० डिसेंबर २०१७ रोजी आला व सर्व आरोपी निर्दोष सुटले. दिल्लीतील सीबीआय कोर्टाने यासंदर्भात निर्णय दिला.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ 'स्पेक्ट्रम' राजा गजाआड
  2. ^ "2G घोटाळा : ए राजा, कनिमोळींसह सर्व आरोपी निर्दोष". Archived from the original on 2017-12-22. 2017-12-21 रोजी पाहिले.