Jump to content

आंदिमुथू राजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ए. राजा

लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२३ मे २०१९
मागील सी. गोपालकृष्णन
मतदारसंघ निलगिरी
कार्यकाळ
२२ मे २००९  १६ मे २०१४
मागील आर. प्रभू
पुढील सी. गोपालकृष्णन
मतदारसंघ निलगिरी
कार्यकाळ
ऑक्टोबर १९९९  मे २००९
मागील पी. राजा रेतिनम
पुढील नेपोलियन
मतदारसंघ पेराम्बलुर
कार्यकाळ
मे १९९६  फेब्रुवारी १९९८
मागील ए. अशोकराज
पुढील पी. राजा रेतिनम
मतदारसंघ पेराम्बलुर

कार्यकाळ
मे २००७  नोव्हेंबर २०१०
पंतप्रधान मनमोहन सिंग
मागील दयानिधी मारन
पुढील कपिल सिबल

जन्म २६ ऑक्टोबर, १९६३ (1963-10-26) (वय: ६२)
अरियालूर जिल्हा
राजकीय पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम

आंदिमुथू राजा (मे १०, इ.स. १९६३) हे भारतीय राजकारणी आहेत. ते द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६,इ.स. १९९९,इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील पेरांबालूर लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातीलच निलगिरीस लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. मनमोहनसिंग सरकारमध्ये ते मे इ.स. २००४ ते मे इ.स. २००७ या काळात पर्यावरणमंत्रीहोते तर मे इ.स. २००७ पासून ते दूरसंचारमंत्री होते.

टू जी स्पेक्ट्रम लिलाव व परवाने वाटपातील कोट्यवधी रूपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपाखाली ११ फेब्रुवारी २०११ रोजी त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली. दूरसंचार मंत्रिपदाचा गैरवापर करून निवडक खासगी कंपन्यांना लाभ मिळवून देणे असे आरोप राजा वरती आहेत.[] या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यासंदर्भात एकूण तीन खटले सुरू आहेत. त्यापैकी दोन सीबीआयच्या कोर्टात, तर तिसरा अंमलबजावणी संचलनालयाकडे आहे. या प्रकरणातील पहिल्या खटल्याचा निकाल २० डिसेंबर २०१७ रोजी आला व सर्व आरोपी निर्दोष सुटले. दिल्लीतील सीबीआय कोर्टाने यासंदर्भात निर्णय दिला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. 'स्पेक्ट्रम' राजा गजाआड[permanent dead link]
  2. "2G घोटाळा : ए राजा, कनिमोळींसह सर्व आरोपी निर्दोष". 2017-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-12-21 रोजी पाहिले.