ए.टी.आर.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एरेइ दा त्रास्पोर्तो रिजियोनाल तथा एव्हियोन्स दि त्रान्सपोर्त रिजनल (ए.टी.आर.) ही इटलीफ्रांस स्थित विमान कंपनी आहे. ही कंपनी १९८१मध्ये एरोस्पाशियाल (आता ई.ए.डी.एस.) व एरिटालिया (आता अलेनिया एरोनॉटिका) या कंपन्यांनी स्थापन केली होती.[१] ए.टी.आर. ७२ए.टी.आर. ४२ ही या कंपनीची प्रमुख विमाने आहेत.

नेपल्सजवळच्या पोमिग्लियानो दार्को येथे अलेनिया एरोनॉटिकाच्या कारखान्यात या विमानांचे धड व शेपट्या तयार केले जातात. पंख फ्रांसच्या बोर्दूमधील ई.ए.डी.एस.च्या कारखान्यात तयार होतात. यांची जोडणी, उड्डाण-चाचणी व प्रमाणीकरण तूलूमधील ए.टी.आर.ची कार्यालये करतात.[२]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "एटीआर माइलस्टोन्स". Archived from the original on 2007-02-02. 2008-10-04 रोजी पाहिले.
  2. ^ ए.टी.आर.चे संकेतस्थळ