एव्हॉन
Appearance
एव्हॉन, कॉलोराडो याच्याशी गल्लत करू नका.
एव्हॉन Avon | |
इंग्लंडची काउंटी | |
इंग्लंडच्या नकाशावर एव्हॉनचे स्थान
| |
देश | इंग्लंड |
मुख्यालय | ब्रिस्टल |
क्षेत्रफळ | १,३४२.७ वर्ग किमी |
लोकसंख्या | ९,०३,८७० (१९९१) |
घनता | {{{घनता}}} प्रति वर्ग किमी |
वेबसाईट |
एव्हॉन हा इंग्लंडमधील एक भूतपूर्व परगणा (काउंटी) आहे. १९९६ साली ह्या काउंटीचे विभाजन करण्यात आले.
ही १९७४ ते १९९६ पर्यंत इंग्लंडच्या पश्चिमेकडील नॉन-मेट्रोपॉलिटन व औपचारिक काउंटी होती. काउंटीचे नाव एव्हॉन नदीच्या नावावरून ठेवले गेले होते जी नदी त्या क्षेत्रातून वाहते. ब्रिस्टॉल आणि बाथच्या काऊंटी बारो तसेच ग्लूस्टरशायर आणि सॉमरसेटच्या काही भागाच्या प्रशासकीय गटासह ही तयार केल्या गेली.
१९९६ मध्ये ही काउंटी रद्द करण्यात आली आणि क्षेत्र चार नवीन एकत्रीकरण प्राधिकरणाच्या दरम्यान विभागले गेले: बाथ आणि नॉर्थ ईस्ट सॉमरसेट, ब्रिस्टल, नॉर्थ सॉमरसेट आणि दक्षिण ग्लूस्टरशायर. ॲव्हॉनचे नाव अजूनही काही कारणांसाठी वापरले जाते. सन २००९ मध्ये या परिसरात सुमारे १.०८ दशलक्ष लोकसंख्या होती.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत