एव्हॉन, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एव्हॉन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. ईगल काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ६,४४७ इतकी होती. येथून दोन मैल (तीन किमी) अंतरावर बीव्हर क्रीक स्की रिसॉर्ट आहे.

इतिहास[संपादन]

इ.स. १८८९मध्ये येथे एव्हिन या नावाने रेल्वेस्थानक उभारण्यात आले होते. कालांतराने त्याचे नाव एव्हॉन करण्यात आले.[१]

ऑगस्ट इ.स. १९७८मध्ये या शहराची विधिवत स्थापना केली गेली.[२][१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. a b "Geographic Names Information System Feature Detail Report". २००७-०८-१९ रोजी पाहिले.
  2. ^ "Colorado Municipal Incorporations". Archived from the original on 27 September 2007. २००७-०८-१८ रोजी पाहिले.