एन.ई.एफ.टी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एन.ई.एफ.टी. तथा राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक वित्तीय प्रदान (इंग्लिश : National Electronic Funds Transfer) हे भारतातील बँकेची सुविधा आहे. याद्वारे भारतातील बँक ग्राहक कुठल्याही बँकेतून कुठल्याही बँकेत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे पाठवी शकतात.

वैशिष्ट्ये[संपादन]

१) दहा लाख रुपयांपर्यंतच्या रकमा एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये प्रदान करण्यासाठी ही सुविधा वापरता येते.

२) सोमवार ते शनिवार सकाळी आठ पासून संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत प्रदान सूचना देता येतात.

३) कामाच्या वेळेत ९ वाजल्यापासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दर तासाला ही प्रणाली तासाभरात घडलेल्या आदान प्रदान व्यवहारांची माहिती घेते, प्रत्येक बँकेला एकूण देय रक्कम किंवा येणे रक्कम किती याचा निव्वळ आकडा काढून त्याप्रमाणे हिशोब ठेवते. एका बँकेचे काही खातेदार इतर बँकातील लोकांना पैसे देऊ शकतात. तसेच इतर बँकातील काही खातेदार या बँकेमधील लोकांना पैसे पाठवू शकतात. थोडक्यात काही पैसे देणे आणि काही घेणे असा एकूण व्यवहार होत असतो. तासाभारातील व्यवहारानंतर प्रत्येक बँकेने पैसे द्यायचे कि घ्यायचे याचा निव्वळ आकडा काढून रिझर्व्ह बँकद्वारे देवाणघेवाणीचा हिशोब केला जातो.

४) तुम्ही दुसऱ्याला पाठवलेले पैसे साधारणतः एक ते दीड तासात खात्यामध्ये जमा होतात.

५) रक्कम केवळ खाते क्रमांक पाहून जमा होत असल्याने काळजी घेणे आवश्यक असते अन्यथा भलत्याच व्यक्तीला पैसे जमा होऊ शकतात.

६) तासाभरात घडलेल्या व्यवहारांची एकच तुकडी (बॅच) करून निव्वळ हिशोब मांडला जातो.

प्रदान व्यवहाराबरोबर द्यायचा तपशील[संपादन]

१) पाठवण्याची रक्कम

२) लाभकर्त्याचा खाते क्रमांक

३) लाभकर्त्याचा आय एफ एस सी कोड

४) लाभकर्त्याचे नाव

५) पैसे पाठवणाऱ्याचा भ्रमणध्वनी क्रमांक किंवा विपत्र पत्ता.