एचएमएस करेजस
Appearance
एच.एम.एस. करेजस तसेच एच.एम.एस. करेजू नावाच्या रॉयल नेव्हीच्या अनेक युद्धनौका होत्या.
- एच.एम.एस. करेजू (१७६१) - ७४ तोफांची फ्रेंचांकडून काबिज केलेली युद्धनौका. १७९६मध्ये मोरोक्कोजवळ बुडाली.
- एच.एम.एस. करेजू (१७९९) - करेजूस या नावानेही ओळखली जाणारी ही ३२ तोफांची फ्रिगेट फ्रेंचांकडून जून १७९९मध्ये काबिज केली गेली. नोव्हेंबरमध्ये याचे नामकरण एस.एम.एस. लुटाइन करण्यात आले व तिचा उपयोग तरंगता तुरूंग म्हणून करण्यात आला. एप्रिल १८०२मध्ये विकून टाकली.
- एच.एम.एस. करेजू (१८००) - १८०० मध्ये बांधलेली ७४ तोफांची युद्धनौका. १८१४मध्ये निलंबित करण्यात आली व नंतर क्वारंटाइन नौका म्हणून वापरली गेली. १८३२मध्ये मोडीत काढली गेली.
- एच.एम.एस. करेजस (५०) - क्रुझर म्हणून बांधणी झालेल्या नौकेचे १९२४मध्ये विमानवाहू नौकेत रूपांतर करण्यात आले. सप्टेंबर १९३९मध्ये यु-२९ने या नौकेस बुडवले.
- एच.एम.एस. करेजस (एस५०) - १९७१ ते १९९३ दरम्यान सेवारत असलेली पाणबुडी. सध्या प्लिमथ येथे नांगरलेली आहे.