Jump to content

अस्तेक प्राचीन ग्रंथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऍझटेक प्राचीन ग्रंथ या पानावरून पुनर्निर्देशित)
अस्तेक जग
अस्तेक समाजव्यवस्था

नाहुआत्ल्
अस्तेक दिनदर्शिका
अस्तेक धर्मव्यवस्था
अस्तेक पुराणे
अस्तेक संस्कृतीतील मनुष्यबळी
अस्तेक स्थापत्यशास्त्र
अझ्टेक तत्त्वज्ञान
कालपुल्ली

अस्तेकांचा इतिहास

अस्तलान
अस्तेक प्राचीन ग्रंथ
अस्तेक तिहेरी मित्रराष्ट्र
मेक्सिकोवरील स्पॅनिश पासदक्रांतन
ला नोचे त्रिस्ते
तेनोच्तित्लानचा पाडाव
हेर्नान कोर्तेझ

अस्तेक युद्ध

पुष्प युद्ध
अस्तेक योद्धा समाज
त्लाकोत्काल्कात्ल
काल्मेकाक

ह्युयी त्लातोआनी

तेनोच (?–१३७६)
अकामापिचत्लि (१३७६१३९५)
वित्सिलिवित्ल् (१३९५१४१७)
चिमालपोपोका (१४१७१४२७)
इत्साकोआत्ल (१४२७१४४०)
मॉतेक्सुमा, पहिला (१४४०१४६९)
अक्सायाकाट्ल (१४६९१४८१)
टिझोक (१४८११४८६)
अहुइट्झोट्ल (१४८६१५०२)
मॉटेक्झुमा, दुसरा (१५०२१५२०)
कुइट्लाहुआक (१५२०)
कुऔहटेमोक (१५२०१५२१)

कोडेक्स बोतुरिनीमधील अझ्टेक आझ्टलान सोडत असल्याचा देखावा.

अझ्टेक ग्रंथ हे कोलंबसपूर्व आणि स्पॅनिश वसाहतयुगात अझ्टेकांकडून लिहिले गेले. अस्तेक संस्कृतीबद्दल महत्त्वाच्या माहितींसाठी प्राथमिक स्रोत म्हणून ह्या ग्रंथांकडे पाहिले जाते.

प्री-कोलंबियन ग्रंथ युरोपियन ग्रंथापेक्षा वेगळे असून, त्यात काही वृत्तांत लिहिले नाही किंवा अझ्टेक भाषेप्रमाणे अर्थपूर्ण चिन्हांकीत अक्षरेही नाहीत, त्यात केवळ बरीच मोठी चित्रे आहेत. वसाहतयुगातील ग्रंथांत चित्रांबरोबर अभिजात नाहुआट्ल (लॅटिन लिपीत), स्पॅनिश, आणि काही प्रमाणात लॅटिनमध्ये लिहिलेले मजकूर आहेत.

जरी अझ्टेकांवर स्पॅनिशांनी विजय मिळवण्यापूर्वीची काही ग्रंथ वाचले असले तरी वसाहती संस्कृतीत ते स्थित्यंतरीत होण्यापसून ट्लाक्युइलोंनी (ग्रंथ रंगविणारा) वाचवायचा प्रयत्‍न केला. सध्यस्थितीत शास्त्रज्ञ ५०० च्या जवळपास वसाहतयुगातील ग्रंथे पाहू शकतात.

कोडेक्स बर्बोनिकस

[संपादन]
कोडेक्स बर्बोनिकसमधील १३वे पान.

कोडेक्स बर्बोनिकस हा एक ग्रंथ असून तो अझ्टेक धर्मगुरूंकडून स्पॅनिशांनी मेक्सिको जिंकण्यापूर्वी किंवा जिंकल्यानंतर लिहिला असावा. इतर प्री-कोलंबियन ग्रंथांप्रमाणे हा ग्रंथही चित्रमय आहे. त्यात काही अक्षरे आहेत, ती नंतर स्पॅनिशांकडून लिहिले गेले. हा ग्रंथ तीन भागांत विभागला जातो

  1. गुंतागुंतीचा टोनालामाट्ल किंवा भविष्य-शकून दर्शविणारी दिनदर्शिका.
  2. मेसोअमेरिकन ५२ वर्षीय कालचक्राची तयार केलेली कागदपत्रे आहेत. त्यात ५२ सौर वर्षातल्या पहिल्या दिवसांपासून प्रत्येक दिवसांच्या तारखा नोंदवल्या आहेत. आणि,
  3. ह्या भागात धार्मिक विधी, समारंभांची माहिती आहे, विशेषतः ५२ वर्षानंतर करावयाच्या विधी, जेव्हा "नवीन आग" पेटवायलाच हवी, त्याबद्दल माहिती दिली आहे.

बोतुरिनी कोडेक्स

[संपादन]

बोतुरिनी कोडेक्स अज्ञात अझ्टेक लेखकाकडून १५३० ते १५४१ च्या मधल्या काळात कधीतरी लिहिले गेले. साधारणतः स्पॅनिशांनी मेक्सिको जिंकल्यानंतर लिहिला गेला. चित्रित केला गेलेला हा ग्रंथ अख्यायिकी आझ्टलानपासून मेक्सिकोच्या दरीपर्यंतचा अझ्टेक प्रवासाची कथा सांगते.

पाने काहीशी वेगळी दर्शविण्यासाठी लेखकाने एक मोठा अमाट्लचा अंजीरच्या झाडाच्या सालीचा ताव अकॉर्डियन नावाच्या वाद्याप्रमाणे २१ १/२ पानांत दुमडलेली होती. २२व्या पानाच्या मधला भाग फाटलेला दिसत असून, लेखकास त्या मुद्द्‍यापर्यंत शेवट करायचा होता की काय हे अजूनही अस्पष्ट आहे. इतर अझ्टेक ग्रंथात चित्रे रंगविलेली असतात तशी ह्या ग्रंथात चित्रे रंगवलेली नाहीत. त्यात केवळ चित्रे काळ्या रंगाने बाह्यरेषा चित्र काढले आहेत.

"तिरा दे ला पेरेग्रिनास्यॉन" (एक पट्टी प्रवासाबद्दल माहिती देते) ह्या नावानेही तो ग्रंथ ओळखला जातो. नंतर हा ग्रंथ पहिल्यांदा ज्या युरोपियनाच्या मालकीचा झाला - लोरेंझो बोतुरिनी बेर्नादुसी (१७०२-१७५१) त्याचेच नाव या ग्रंथास देण्यात आले.

कोडेक्स मेंडोझा

[संपादन]
कोडेक्स मेंडोझामधले पहिले पान. टेनोच्टिट्लान शहराची बांधणी करण्यासाठी योग्य जागेचा केलेला शोधाचे वर्णन.

कोडेक्स मेंडोझा हा ग्रंथ चित्रमय कागदपत्रे असून, त्यात स्पॅनिश स्पष्टीकरणार्थ टीपा आणि टीका आहेत. हा लेख बहुधा १५४१ च्या जवळपास लिहिला गेला. हा ग्रंथ तीन भागांत विभागला जातो.

  1. प्रत्येक अझ्टेक राज्यकर्त्यांचा इतिहास आणि त्यांनी जिंकलेला भूप्रदेश
  2. खंडणी देणाऱ्या राज्यांनी किती खंडणी दिली यांची यादी. आणि
  3. अझ्टेक लोकांचे नेहमीचे जीवन याची माहिती.

फ्लोरेंटिन कोडेक्स

[संपादन]

अंदाजे १५४० ते १५८५ च्या सुमारास कधीतरी बेर्नार्दिनो दि सहागुनच्या देखरेखीखाली १२ पुस्तकांचा संच असलेला फ्लोरेंटिन कोडेक्सची निर्मिती केली गेली. मूळ स्रोत असलेल्या माहिती, जी सध्या नष्ट झाली आहे, कदाचित स्पॅनिश अधिकाऱ्यांकडून नष्ट केली गेली, ज्यांनी सहागुनचे हस्तलिखित जप्त केले, त्या माहितींची नक्कल ह्या ग्रंथात केलेली होती. बहुधा, स्पॅनिशांनी मेक्सिको जिंकण्यापूर्वीच्या अझ्टेक जीवनाबद्दल माहिती देणाऱ्या इतर स्रोतांपैकी फ्लोरंटिन कोडेक्स हा मुख्य स्रोत होता. १९७९ येइपर्यंत ह्या ग्रंथाची चित्रांसहित पाने प्रकाशित केली गेली नव्हती. त्याच्याआधी (१९७९ च्या आधी) ह्या ग्रंथाचे परीक्षण करून ते स्पॅनिश भाषेत भाषांतरित होउन त्याचीच आवृती उपलब्ध होती.

कोडेक्स ओसुना

[संपादन]
कोडेक्स ओसुनामधील ३४वे पान, ज्यात अझ्टेक तिहेरी मित्रराष्ट्रांचे चिन्हांकित भाषा दाखविली आहे.

कोडेक्स ओसुना हा सात विविध, वेगवेगळे असलेल्या कागदपत्रांचा संच १५६५ च्या सुमारास निर्मिला गेला. जेर्नोनिमो दि वाल्देर्रामाकडून १५६३-६६ च्या सुमारास असलेले राजप्रधिनिधी (व्हॉइसरॉय) लुइस दि वेलास्कोच्या कारभाराविरोधी साक्षीपुरावे त्यात मांडले आहेत. त्यात अशीही माहिती दिली आहे की, स्थानिक इंडियन लोक विविध वस्तूंबद्दल पैसे देत नाहीत आणि इतर कामे बिनपगारी करत.

मुळात हा ग्रंथ केवळ चित्रमय असलेल्या प्रकारात मोडत होता. स्पॅनिश अधिकाऱ्यांकडून केलेल्या पाहणीत नाहुआट्लमध्ये माहिती त्या कागदपत्रांवर मांडली गेली, आणि त्यानंतर स्पॅनिश भाषांतरेही त्यात मागहून घालण्यात आली.

कोडेक्स मॅग्लियाबेचियानो

[संपादन]
कोडेक्स मॅग्लियाबेचियानोमधील ११वे पान ज्यात दिवसांच्या खुणा दाखविल्या आहेत: गारगोटी (सुरी), पाउस, फूल, आणि मगर.

१६व्या शतकाच्या मध्यंतरी, म्हणजेच स्पॅनिश वसाहतकाळात कोडेक्स मॅग्लियाबेचियानो हा ग्रंथ रचला गेला. मुख्यत्वे हा ग्रंथ धार्मिकसंदर्भात कागदपत्रे असून टोनाल्पोह्युआलीच्या २० दिवसांच्या नावांचे, १८ महिन्यातील सण-समारंभ, ५२-वर्ष चक्र, विविध देव, इंडियन धार्मिक विधी, विश्वउत्पत्तीबद्दलच्या श्रद्धा ह्याचे वर्णन केले आहे.

कोडेक्स मॅग्लियाबेचियानो ग्रंथास युरोपियन कागदांची ९२ पाने असून त्याबरोबर काही चित्रे आणि स्पॅनिश भाषेतील मजकूर पानांच्या दोन्ही बाजूंना आहेत. ह्या ग्रंथास नंतर एका इटॅलियन हस्तलिखित संग्राहक अंटोनियो मॅग्लियाबेचियानोच्या नावावरून नामकरण करण्यात आले. सध्यस्थितीत तो इटलीमधे, फ्लोरेन्समधे बिब्लियोटेका नॅझियनाले सेंट्रालेत ठेवला गेला आहे.

औबिन कोडेक्स

[संपादन]

औबिन कोडेक्स हे अझ्टेकांचा आझ्टलानपासून स्पॅनिशांनी मेक्सिको जिंकून त्यानंतर स्पॅनिश वसाहतकाळापर्यंतचा - १६०७ च्या शेवटपर्यंतचा चित्रमय इतिहास असलेला ग्रंथ आहे. साधारणतः हा ग्रंथ १५७६ साली लिखाण केले गेल्याचे मानले जाते. भांडणतंटा करून दियेगो दुरानांच्या देखरेखीखाली ह्या ग्रंथाची तयारी झाली असल्याची शक्यता आहे, नंतर ते १८६७मध्ये हिस्तोरिया दे लास इंदियास दे नुएव्हा-एस्पान्या इ इस्लेस दे तियेरा फर्मे ह्या नावे प्रकाशित होऊन त्यात लेखकांच्या नावात दुरानचा उल्लेख केलेला आहे.

इतर विषयांबरोबर औबिन कोडेक्समध्ये १५२०मधील टेनोच्टिट्लानमधील मुख्य देवळातील हत्याकांडाचे स्थानिक लोकांनी केलेले वर्णन दिले आहे.

हा ग्रंथास "मॅन्युस्क्रिटो दि १५७६"ही (१५७६ चे हस्तलिखित) म्हणले जाते. सध्यस्थितीत पॅरिसमध्ये बिब्लियोथेक्व नॅशनालेमध्ये ठेवले आहे. त्याची नक्कल आवृत्ती प्रिन्सटन विद्यापीठच्या वाचनालयात रॉबर्ट गॅर्रटच्या संग्रहात ठेवले आहे. औबिन कोडेक्स आणि औबिन टोनामाट्ल ह्या दोन वेगळ्या गोष्टी असून त्यात दोन्हींत काहीही संबंध नाही.

  • हिस्तोरिया दे लास इंदियास दे नुएव्हा-एस्पान्या इ इस्लेस दे तियेरा फर्मे - Historia de las Indias de Nueva-España y isles de Tierra Firme

कोडेक्स कोझ्कात्झिन

[संपादन]

कोडेक्स कोझ्कात्झिन हा ग्रंथ स्पॅनिशांनी मेक्सिको जिंकल्यानंतरच्या काळात निर्माण केली गेली. हा ग्रंथ १५७२ ही नोंदविलेली तारीख दर्शवित असला तरी तो त्यानंतरच्या काही काळाने निर्मान केला गेला, त्या हस्तलिखितामध्ये युरोपियन कागदांचे १८ ताव (३६ पाने) आहेत. पहिला भाग १४३९ मधील इट्झाकोआट्लने जिंकलेल्या प्रदेशांची यादी दाखविली आहे आणि दियेगो मेंदोझा विरोधात काहीशया तक्रारी नोंदविलेल्या आहेत. इतर पाने ट्लाटेलोल्को आणि टेनोच्टिट्लानची ऐतिहासिक आणि राजेशाही घराण्याची वंशावळाची यादी दिली आहे. शेवटचे पान खगोलविषयक असून त्यात स्पॅनिशमध्ये काही मुद्दे आहेत.

डॉन जुआन लुइस कोझ्कात्झिन ह्याच्या नावावरून ह्या ग्रंथाचे नामकरण झाले, ज्याचा ह्या ग्रंथात "अल्काल्दे ओर्दिनारियो दे एस्ता सिउदाद दे मेक्सिको" (मेक्सिकोच्या या शहराचा सामान्य नगराध्यक्ष) म्हणून उल्लेख केला आहे. सध्या तो ग्रंथ पॅरिसमध्ये बिब्लियोथेक्व नॅशनालेमध्ये ठेवलेला आहे.

  • अल्काल्दे ओर्दिनारियो दे एस्ता सिउदाद दे मेक्सिको - alcalde ordinario de esta ciudad de México

कोडेक्स इक्स्टलिल्क्सोचिट्ल

[संपादन]

कोडेक्स इक्स्टलिल्क्सोचिट्ल हा ग्रंथ १७व्या शतकात लिहिला गेला, ज्यात थोडक्यात बरीच माहिती दिलेली आहेत. जे वार्षिक सण आणि धार्मिक विधी अझ्टेकांकडून साजरे होतात त्याची एक दिनदर्शिका मेक्सिकन वर्षे - टेओकाली बद्दल लिहिले आहे. प्रत्येक १८ महिने अझ्टेक देव किंवा ऐतिहासिक व्यक्तींचे प्रधिनिधीत्व करते.

स्पॅनिशमध्ये लिहिला गेलेला हा ग्रंथ ५० पानांचा असून, त्यात २७ वेगवेगळ्या असलेल्या युरोपियन कागदांचा ताव आणि २९ चित्रांचा समावेश होतो. कोडेक्स मॅग्लियाबेचियानोसारख्या स्रोतांपासून हा ग्रंथ बनवला गेला. नंतर ह्या ग्रंथाचे नामकरण टेक्सकोकोच्या राज्यकर्त्या कुटुंबामधला फर्नांदो दि अल्वा कोर्तेझ इक्स्टलिल्क्सोचिट्लच्या (१५६८ आणि १५७८-c. १६५०), नावाने करण्यात आले. सध्या तो ग्रंथ पॅरिसमध्ये बिब्लियोथेक्व नॅशनालेमध्ये ठेवलेला आहे.

लिबेलस दि मेडिसिनालिबस इंदोरम हेर्बिस

[संपादन]
लिबेलस दि मेडिसिनालिबस इंदोरम हेर्बिस मधील पान. त्यात काही वनस्पतींची रेखाटने आणि काही मजकूर दाखविला आहे.

लिबेलस दि मेडिसिनालिबस इंदोरम हेर्बिस (मूळ लॅटिन शब्द. अर्थ: इंडियनांचे वैद्यकीय वनस्पतींवरचे छोटे पुस्तक) हा ग्रंथ म्हणजे वनस्पतिविषयक हस्तलिखित असून, त्यात अझ्टेकांकडून विविध वैद्यकीय गुणधर्म असलेल्या ज्या वनस्पती वापरल्या जातात, त्याचे माहिती दिलेली आहे. १५५२मध्ये मार्तिन दि ला क्रुझ ह्याने ट्लाटेलोल्कोमध्ये नाहुआट्ल भाषेत निर्माण केली (ज्याची प्रत खूप काळ टिकली नाही). नंतर जुआन बादियानोने मूळ नाहुआट्लमधून लॅटिनमध्ये भाषांतरित केले. लिबेलस हा ग्रंथ बादियानोने अनुवादित केल्यानंतर बादियानस मॅनुस्क्रिप्ट ह्या नावानेही ओळखला जाई, नंतर तो तो मूळ लेखक आणि अनुवादक ह्याच्या नावाने - कोडेक्स दि ला क्रुझ-बादियानो ह्या नावाने ओळखला जाई. या नंतर १७व्या शतकातील हस्तलिखितांचा संग्राहक ज्याच्याकडे हा ग्रंथही होता, तो कार्डिनल फ्रान्सिस्को बर्बेरिनी ह्याच्या नावाने तो ग्रंथ कोडेक्स बर्बेरिनी म्हणूनही ओळखला जाई.

सूची

[संपादन]

अझ्टेक प्राचीन ग्रंथ - Aztec Codices

ट्लाक्युइलो - Tlacuilo

कोडेक्स बोर्बोनिकस - Codex Borbonicus

बोतुरिनी कोडेक्स - Boturini Codex

अकॉर्डियन - Accordion

तिरा दे ला पेरेग्रिनास्यॉन - Tira de la Peregrinación

लोरेंझो बोतुरिनी बेर्नादुसी - Lorenzo Boturini Bernaducci

कोडेक्स मेंडोझा - Codex Mendoza

फ्लोरेंटिन कोडेक्स - Florentine Codex

बेर्नार्दिनो दि सहागुन - Bernardino de Sahagún

कोडेक्स ओसुना - Codex Osuna

जेर्नोनिमो दि वाल्देर्रामाकडून - Jerónimo de Valderrama

लुइस दि वेलास्को - Luis de Velasco

कोडेक्स मॅग्लियाबेचियानो - Codex Magliabechiano

टोनाल्पोह्युआली - Tonalpohualli

अंटोनियो मॅग्लियाबेचियानो - Antonio Magliabechi

औबिन कोडेक्स - Aubin Codex

दियेगो दुरान - Diego Durán

मॅन्युस्क्रिटो दि १५७६ - Manuscrito de 1576

प्रिन्सटन विद्यापीठ - Princeton University

रॉबर्ट गॅर्रट - Robert Garrett

औबिन टोनामाट्ल - Aubin Tonamatl

कोडेक्स कोझ्कात्झिन - Codex Cozcatzin

दियेगो मेंदोझा - Diego Mendoza

डॉन जुआन लुइस कोझ्कात्झिन - Don Juan Luis Cozcatzin

कोडेक्स इक्स्टलिल्क्सोचिट्ल - Codex Ixtlilxochitl

टेओकाली - teocalli

फर्नांदो दि अल्वा कोर्तेझ इक्स्टलिल्क्सोचिट्ल - Fernando de Alva Cortés Ixtlilxochitl

लिबेलस दि मेडिसिनालिबस इंदोरम हेर्बिस - Libellus de Medicinalibus Indorum Herbis

मार्तिन दि ला क्रुझ - Martín de la Cruz

जुआन बादियानो - Juan Badiano

बादियानस मॅनुस्क्रिप्ट - Badianus Manuscript

कोडेक्स दि ला क्रुझ-बादियानो - Codex de la Cruz-Badiano

कार्डिनल फ्रान्सिस्को बर्बेरिनी - Cardinal Francesco Barberini

कोडेक्स बर्बेरिनी - Codex Barberini

इतर ग्रंथे

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]