उर्वशी बुटालिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उर्वशी बुटालिया (१९५२:अंबाला, पंजाब, भारत - ) या भारतीय स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि प्रकाशिका आहेत. त्यांनी १९८४मध्ये रितू मेनन यांसह काली फॉर विमेन ही स्त्रीवादी प्रकाशन संस्था काढली. २००३मध्ये ही संस्था बंद पडल्यावर त्यांनी झुबान बूक्स ही प्रकाशन संस्था काढली. याआधी त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये काम केले होते.