उमा चंद्रशेखर वैद्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

डाॅ. उमा चंद्रशेखर वैद्य (जन्म : इ.स. १९५२) या एक संस्कृत विद्वान आहेत. सुमारे चाळीस वर्षे त्यांनी संस्कृत भाषेच्या संशोधनाच्या आणि प्रसाराच्या कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. मुंबई विद्यापीठातील संस्कृत विभागाच्या त्या सन २०१२पर्यंत विभागप्रमुख होत्या. त्यानंतर त्या रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या कुलगुरू झाल्या ११-१-२०१३ पासून ते १७-९-२०१७ पर्यंत त्या कुलगुरू होत्या.

शिक्षण आणि कारकीर्द[संपादन]

पुणे विद्यापीठातून संस्कृत या विषयाची पदवी प्रथम श्रेणीने मिळवल्यावर डाॅ. उमा वैद्य यांनी एम.ए. संस्कृत व्याकरण आणि पाली विषयातील एम.ए. ही पदवी विशेष गुणवत्तेसह मिळवली. पाणिनी अष्टाध्यायी संशोधन आणि योगवाशिष्ठाचा धार्मिक प्रभाव आणि महाराष्ट्र या विषयावर संशोधन करून त्यांनी पीएच.डी. मिळवली. मुंबई विद्यापीठाच्या भांडारकर संस्कृत विभागाच्या प्रमुख आणि गुरुदेव टागोर अध्यासनाच्या त्या प्रमुख होत्या. मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये संस्कृत विभागाच्या त्या प्रमुख होत्या. संस्कृत भाषेच्या संशोधनावरचे त्यांचे ७०च्या वर शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. सायनाचार्य, शंकराचार्य, पतंजली यांच्या साहित्याचा आणि तत्त्वज्ञानाचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. आदी शंकराचार्यांच्या सर्व भाष्यांचा अभ्यास आणि तत्त्वज्ञान या विषयांवर त्यांचे डॉक्टरेटनंतरचे संशोधन सुरू आहे. याशिवाय धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरातर्फे सुरू झालेल्या, श्री समर्थ रामदासांच्या मूळ संस्कृत वाल्मीकी रामायणाच्या संशोधनकार्यातही त्या गर्क आहेत. (सन २०१४ची बातमी).

उमा वैद्य यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • मुंबईच्या श्री शंकर मठम् या संस्थेने सन २०००पासून संस्कृत पंडितांचा "आदि शंकराचार्य' पुरस्काराने सन्मान करण्यास प्रारंभ केला. डाॅ.उमा शंकर वैद्य यांना २०१४ सालच्या डिसेंबरमध्ये हा पुरस्कार मिळाला.
  • महाराष्ट्र सरकारचा कालिदास पुरस्कार
  • अखिल भारतीय विवाद परिषदेचा साहित्य सरस्वती पुरस्कार