उत्पत्तीचे पुस्तक
Appearance
उत्पत्तीचे पुस्तक
| ह्याचा भाग | तोराह, जुना करार, Catholic Old Testament, Hexateuch, Pentateuch |
|---|---|
| मूळ लेबल | בְּרֵאשִׁית |
| उपनाव | ספר הישר |
| लघुनाम | Gen, Gn, Gên, Rdz |
| शीर्षक | בראשית |
| मालिका | तोराह, Pentateuch |
| मुख्य विषय | cosmogony, Jewish history |
| पुढील | स्थलांतराचे पुस्तक |
| गट-प्रकार | धर्मग्रंथ |
| लेखक | मोझेस |
| वापरलेली भाषा | Biblical Hebrew |
| Depicts | कुटुंब, Cain and Abel, Garden of Eden, creation |
| ध्रुपद | בראשית ברא אלוהים את השמים ואת הארץ |
| शेवटची ओळ | So Joseph died, being an hundred and ten years old: and they embalmed him, and he was put in a coffin in Egypt. |
| Copyright status | सार्वजनिक |
| Entry in abbreviations table | Genesis |
| Stack Exchange tag | https://hermeneutics.stackexchange.com/tags/genesis, https://christianity.stackexchange.com/tags/genesis, https://judaism.stackexchange.com/tags/genesis-bereishith |
उत्पत्तीचे पुस्तक, हिब्रू बायबल आणि जुना कराराचे पहिले पुस्तक आहे. जगाच्या निर्मितीविषयी आणि यहुदी लोकांच्या उत्पत्तीचा अहवाल यात आहे.
या पुस्तकाचे प्राचीन इतिहास (प्रकरण १-११) आणि पूर्वजांचा इतिहास (प्रकरण १२-५०) असे दोन भाग आहेत.
रचना
[संपादन]“उत्पत्ती” हे 'एल्ले तोलेदोत' (אלה תֻּלְדֹת) या वारंवार येणाऱ्या वाक्यांशाभोवती रचलेले दिसते. एल्ले तोलेदोत याचा अर्थ “ही वंशावळ/ही पिढ्यांची नोंद आहे” असा होतो. या वाक्यांशाचा पहिला उपयोग "आकाश व पृथ्वी निर्माण केल्याचा इतिहास" चा उल्लेख करण्यासाठी केला आहे, तर त्यानंतरचे उपयोग वेगवेगळ्या व्यक्तींचा उल्लेख करण्यासाठी केले आहेत. तोलेदोत याप्रमाणे उत्पत्तीचे पुस्तक पुढील विभागांमध्ये विभाजित होते:
- उत्पत्ती १:१–२:३ सुरुवातीला (प्रस्तावना)
- उत्पत्ती २:४–४:२६ आकाश आणि पृथ्वीचा तोलेदोत (कथा)
- उत्पत्ती ५:१–६:८ आदामचा तोलेदोत (वंशावळी)
- उत्पत्ती ६:९–९:२९ नोहाचा तोलेदोत (उत्पत्ती जलप्रलय)
- उत्पत्ती १०:१–११:९ नोहाचे मुले, शेम, हाम, आणि याफेथ यांचा तोलेदोत (वंशावळी)
- उत्पत्ती ११:१०–२६ शेमचा तोलेदोत (वंशावळी)
- उत्पत्ती ११:२७–२५:११ तेरहचा तोलेदोत (अब्राहामची कथा)
- उत्पत्ती २५:१२–१८ इश्माएलचा तोलेदोत (वंशावळी)
- उत्पत्ती २५:१९–३५:२९ इसहाकचा तोलेदोत (याकोबची कथा)
- उत्पत्ती ३६:१–३६:८ एसावाचा तोलेदोत (वंशावळी)
- उत्पत्ती ३६:९–३७:१ एसावा "अदोम्यांचा पिता"चा तोलेदोत (वंशावळी)
- उत्पत्ती ३७:२–५०:२६ याकोबचा तोलेदोत (योसेफची कथा)