उत्तर सेंटिनेल बेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उत्तर सेंटीनेल बेट या पानावरून पुनर्निर्देशित)
उत्तर सेंटिनेल बेट
इ.स. २००९ मधील उत्तर सेंटिनेल बेट
उत्तर सेंटिनेल बेट is located in अंदमान आणि निकोबार बेटे
उत्तर सेंटिनेल बेट
उत्तर सेंटिनेल बेट
Geography
स्थान बंगालचा उपसागर
Coordinates 11°33′25″N 92°14′28″E / 11.557°N 92.241°E / 11.557; 92.241गुणक: 11°33′25″N 92°14′28″E / 11.557°N 92.241°E / 11.557; 92.241 [१]
Archipelago Andaman Islands[२]
Adjacent bodies of water बंगालचा उपसागर
क्षेत्रफळ साचा:Convinfobox/pri2[३]
लांबी ७.८ km (४.८५ mi)
रुंदी ७.० km (४.३५ mi)
Coastline ३१.६ km (१९.६४ mi)
Highest elevation १२२ m (४०० ft)[१]
Administration
Union territory Andaman and Nicobar
District South Andaman
Tehsil Port Blair Tehsil[४]
Demographics
Demonym North Sentinelese
Population 39[५] (2018 estimate)
actual population highly uncertainसाचा:Sndmay be as high as 400
Population rank unknown
Ethnic groups Sentinelese[२]
Additional information
Time zone
PIN 744202[६]
ISO code IN-AN-00[७]
Official website andaman.nic.in
Avg. summer temperature ३०.२ °से (८६.४ °फॅ)
Avg. winter temperature २३.० °से (७३.४ °फॅ)
Census Code 35.639.0004

उत्तर सेंटिनेल बेट हे अंदमान बेटांपैकी एक आहे. हे बेट बंगालच्या उपसागरातील एक भारतीय द्वीपसमूह आहे. ज्यामध्ये दक्षिण सेंटिनेल बेटाचाही समावेश आहे.[८] हे सेंटिनेली लोकांचे घर आहे. हे एक स्वैच्छिक अलगाव असलेली जमात आहे. यांनी अनेकदा मुद्दामुन बाहेरील जगापासून स्वतःला अलिप्त ठेवलीले आहे.

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाचा १९५६ चा आदिवासी जमाती संरक्षण कायद्यानुसार[९] या बेटावर प्रवास करण्यास आणि ५ nautical mile (९.३ किमी) पेक्षा जवळ जाण्यास इतर सर्वांना प्रतिबंधित करते., उर्वरित आदिवासी समुदायाचे "मुख्य भूमी" संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी ज्यांच्या विरुद्ध (बहुतेकदा) त्यांना प्रतिकारशक्ती नसावी. या भागात भारतीय नौदलाची गस्त असते.[१०]

नाममात्र, हे बेट दक्षिण अंदमान प्रशासकीय जिल्ह्यात मोडते. अंदमान आणि निकोबार बेटांच्या भारतीय केंद्रशासित प्रदेशाचा एक भाग आहे.[११] व्यवहारात, भारतीय अधिकारी बेटवासीयांची एकटे रहाण्याच्या इच्छेला मान देतात., बाहेरील लोकांना वाजवी सुरक्षित अंतरावरून दूरस्थ निरीक्षण (बोटीद्वारे आणि कधीकधी हवाई) करण्यास प्रतिबंधित करतात. एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने किनार्‍यावर पाऊल टाकले आणि तेथील लोकांनी त्या व्यक्तीला ठार मारले तर भारत सरकार लोकांच्या हत्येसाठी सेंटिनेलीजवर खटला चालवणार नाही असा नियम आहे.[१२][१३] या घटनेसाठी त्या व्यक्तीलाच जबाबदार धरले जाईल. हे बेट भारताचे संरक्षित क्षेत्र आहे. २०१८ मध्ये, भारत सरकारने २९ बेटे वगळली. यात उत्तर सेंटिनेल बेटाचाही समावेश आहे. हे एक प्रतिबंधित क्षेत्र परमिट (आर.ए.पी) आहे.[१४] नोव्हेंबर २०१८ मध्ये, सरकारच्या गृह मंत्रालयाने सांगितले की भेटीवरील बंदी शिथिल करण्याचा उद्देश संशोधक आणि मानववंशशास्त्रज्ञांना (पूर्व-मंजूर मंजुरीसह) शेवटी सेंटिनेल बेटांना भेट देण्यास अनुमती देण्यात आली.[१५]

सेंटिनेली लोकांनी या बेटाजवळ येणाऱ्या जहाजांवर वारंवार हल्ले केले आहेत. बेटवासी बोटींवर तसेच कमी उडणाऱ्या हेलिकॉप्टरवर बाण सोडताना दिसले आहेत. अशा हल्ल्यांमुळे बरेच लोक जखमी आणि मारले गेले आहेत. २००६ मध्ये, सेंटिनेली लोकांनी दोन मच्छिमारांना ठार मारले. त्या मच्छिमारांची बोट त्या किनाऱ्यावर वाहून गेली होती. २०१८ मध्ये एक अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी, २६ वर्षीय जॉन चाऊ, याने तेथे जाऊन धर्मपरीवर्तन करण्याचा प्रयत्न केला. कायद्याच्या विरुद्ध जाऊन त्याने तीन वेगवेगळ्या वेळा बेटवासीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने स्थानिक मच्छिमारांना तेथे घेऊन जाण्यासाठी लाच दिल्याचेही मानले जाते. सेंटिनेली लोकांनी त्याला ठार मारले.[१६][१७][१८]

इतिहास[संपादन]

ओंगे या जमातीला उत्तर सेंटिनेल बेटाच्या अस्तित्वाची जाणीव होती. ते अंदमानातील इतर स्थानिक लोकांपैकी एक आहेत. या बेटाचे पारंपारिक नाव चिया डाक्वॉकवेहे आहे.[२][१९] सेंटिनेली लोकांमध्ये मजबूत सांस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. तथापि, १९व्या शतकात ब्रिटीशांनी उत्तर सेंटिनेल बेटावर आणलेल्या ओन्जेसला सेंटिनेलीज भाषा समजू शकली नव्हती. त्यामुळे या लोकांना विभक्त होऊन मोठा कालावधी झाल्याचे समजते.[२][१९]

राजकीय स्थिती[संपादन]

अंदमान आणि निकोबार (आदिवासी जमातींचे संरक्षण) नियमन, १९५६ या प्रदेशातील सेंटिनेली लोक आणि इतर मूळ जमातींना संरक्षण प्रदान करते.[२०] अंदमान आणि निकोबार प्रशासनाने २००५ मध्ये सांगितले की त्यांचा सेंटिनेली लोकांच्या जीवनशैलीत किंवा निवासस्थानात हस्तक्षेप करण्याचा कोणताही हेतू नाही आणि त्यांच्याशी आणखी संपर्क साधण्यात किंवा बेटावर शासन करण्यात त्यांना रस नाही.[२१] उत्तर सेंटिनेल बेट हा कायदेशीररित्या भारताचा स्वायत्त प्रशासकीय विभाग आहे. तरीही काही लोक तेथील लोकांना प्रभावीपणे स्वायत्त[२२][२३] किंवा स्वतंत्र मानतात.[२२][२४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b साचा:Cite enroute
  2. ^ a b c d Weber, George. "Chapter 8: The Tribes; Part 6. The Sentineli". The Andamanese. Archived from the original on 7 May 2013.
  3. ^ "Forest Statistics" (PDF). Department of Environment & Forests Andaman & Nicobar Islands. p. 7. Archived from the original (PDF) on 20 December 2016. 18 December 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "Andaman and Nicobar Islands Census 2011" (PDF). Archived from the original (PDF) on August 28, 2017.
  5. ^ "Mysterious 'lost' tribe kills US tourist". news.com.au. November 22, 2018. Archived from the original on 24 November 2018. November 22, 2018 रोजी पाहिले.
  6. ^ "A&N Islands – Pincodes". 22 September 2016. Archived from the original on 23 March 2014. 22 September 2016 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  7. ^ Registration Plate Numbers added to ISO Code
  8. ^ "A visit to North Sentinel island: 'Please, please, please, let us not destroy this last haven'". Archived from the original on 24 November 2018. 24 November 2018 रोजी पाहिले.
  9. ^ "Ten Indian families world knows nothing about". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2018-11-25. Archived from the original on 18 January 2021. 2018-11-22 रोजी पाहिले.
  10. ^ "Indian authorities struggle to retrieve US missionary feared killed on remote island". CNN (इंग्रजी भाषेत). 2018-11-25. Archived from the original on 25 November 2018. 2018-11-25 रोजी पाहिले.
  11. ^ "Village Code Directory: Andaman & Nicobar Islands" (PDF). Census of India. Archived (PDF) from the original on 5 August 2016. 16 January 2011 रोजी पाहिले.
  12. ^ Foster, Peter (8 February 2006). "Stone Age tribe kills fishermen who strayed onto island". The Telegraph. London, UK. Archived from the original on 25 December 2018. 4 April 2018 रोजी पाहिले.
  13. ^ Bonnett, Alastair: Off The Map, page 82.
  14. ^ "Sentinelese Tribe: What Headlines Won't Tell You About Eco-Tourism". The Quint (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 25 November 2018. 2018-11-25 रोजी पाहिले.
  15. ^ "US National Defied 3-tier Curbs & Caution to Reach Island". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2018-11-23. Archived from the original on 26 November 2018. 2018-11-25 रोजी पाहिले.
  16. ^ "American tourist killed in Andaman island, 7 arrested". Indian Express. 27 November 2018. Archived from the original on 27 November 2018. 27 November 2018 रोजी पाहिले.
  17. ^ "Police to probe who helped John Chau's trip to remote island in Andaman..." Reuters. 23 November 2018. Archived from the original on 27 November 2018. 27 November 2018 रोजी पाहिले.
  18. ^ "American on deadly trip to Indian island: 'God sheltered me'" (इंग्रजी भाषेत). MY Northwest. 23 November 2018. Archived from the original on 25 March 2019. 27 November 2018 रोजी पाहिले.
  19. ^ a b Pandya, Vishvajit (2009). In the Forest: Visual and Material Worlds of Andamanese History (1858–2006). Lanham, Maryland: University Press of America. ISBN 978-0-7618-4272-9. LCCN 2008943457. OCLC 371672686. OL 16952992W. Archived from the original on 10 June 2016. 4 October 2015 रोजी पाहिले.
  20. ^ "Advertising Do not disturb this Andaman island". Indian Express. 23 November 2018. Archived from the original on 23 November 2018. 23 November 2018 रोजी पाहिले.
  21. ^ Bhaumik, Subir (5 March 2005). "Extinction threat for Andaman natives". Archived from the original on 14 September 2012. 8 May 2005 रोजी पाहिले.
  22. ^ a b Kanchan Mukhopadhyay; M. Arbindo Singh (14 May 2007). "8. Some Observations on Tsunami and the Ang of the Andaman Islands". In V.R. Rao (ed.). Tsunami in South Asia: Studies of Impact on Communities of Andaman and Nicobar Islands. Allied Publishers. p. 120. ISBN 9798184241890. Archived from the original on 19 May 2020. 23 November 2018 रोजी पाहिले.
  23. ^ Claire Wintle (2013). Colonial Collecting and Display: Encounters with Material Culture from the Andaman and Nicobar Islands. Berghahn Books. p. 9. ISBN 978-0-85745-942-8. Archived from the original on 19 May 2020. 23 November 2018 रोजी पाहिले.
  24. ^ Ed. Aruna Ghose et al, DK Eyewitness Travel Guide: India, 2014, p. 627.

बाह्य दुवे[संपादन]