उत्तर बेट, न्यू झीलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

न्यू झीलँडचे उत्तर बेट या देशातील दोन प्रमुख बेटांपैकी आहे. १,१३,७२९ किमी क्षेत्रफळाचे हे बेट आकारानुसार जगातील १४व्या क्रमांकाचे आहे. जून २०१४ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ३४,५०,८०० इतकी होती. ही लोकसंख्या न्यू झीलँडच्या एकूण लोकसंख्येच्या ७७% होती.

माओरी भाषेत टे इका-आ-मौई असे नाव असलेल्या बेटाच्या आणि दक्षिण बेटाच्या मध्ये कूकची सामुद्रधुनी आहे. उत्तर बेटावर ऑकलंड, हॅमिल्टन, रोटोरुआ, नेपियर, हेस्टिंग्ज आणि वेलिंग्टन ही मोठी शहरे आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]