दक्षिण बेट, न्यू झीलँड
Jump to navigation
Jump to search
न्यू झीलँडचे दक्षिण बेट या देशातील दोन प्रमुख बेटांपैकी आहे. १,५०,४३७ किमी२ क्षेत्रफळाचे हे बेट आकारानुसार जगातील १२व्या क्रमांकाचे आहे. जून २०१५च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १०,७६,३०० इतकी होती. ही लोकसंख्या न्यू झीलँडच्या एकूण लोकसंख्येच्या २३% होती.
माओरी भाषेत टे वैपूनामू असे नाव असलेल्या या बेटाच्या आणि उत्तर बेटाच्या मध्ये कूकची सामुद्रधुनी आहे. दक्षिण बेटावर क्राइस्टचर्च, ड्युनेडिन, नेल्सन ही मोठी शहरे आहेत.