इस्रायलची मोसाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इस्रायलची मोसाद हे ठाणे येथील परममित्र पब्लिकेशन्स या प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केलेले पुस्तक आहे.

लेखक : - पंकज कालुवाला

प्रकाशक : - परममित्र पब्लिकेशन्स, ठाणे

पृष्ठे: 576 (दुसरी वाढीव आवृत्ती)

किंमत: 600/-


निरनिराळ्या गुप्तचर संघटनांचा विषय निघाला की, आपल्या डोळ्यांसमोर अमेरिकेचीसी.आय.ए. , पूर्वाश्रमीच्यासोव्हिएत रशियाची के.जी.बी. , ब्रिटिशांचीएम.आय. 6 यांसारख्यागुप्तचर संस्थांची नावे तरळून जातात. आपणभारतीय असल्याने पाकिस्तानच्या आय.एस.आय.चे नावही डोळ्यांसमोरयेते. हे सगळंखरं असलं तरी आपल्या नजरेत ठसठशीतपणे भरते “इस्रायलची मोसाद”हे नाव.मूठभर देशाची चिमूटभर गुप्तचर संस्था हे तिचे खरे स्वरूप.मात्र कारवाया जगद्व्यापी.भल्याभल्यांनाही पुरून उरणाऱ्या.. आजूबाजूला असलेली अरब शत्रू राष्ट्र, इस्लामी दहशतवादी, आंतरराष्ट्रीय राजकारणातील शहकाटशहयातून मोसादनेचआतापर्यंत आपल्या मातृभूमीला अक्षरशः तारलं आहे. तिच्याच कारवायांचा मागोवा घ्यायचा हा प्रयत्न.

अनुक्रमणिका

1) ऐतिहासिक पार्श्वभूमी 2)पूर्वपीठिका,स्थापना व विकास 3)ऑपरेशन थीफ- इस्रायली गुप्तचर संघटनेची महत्त्वपूर्ण कामगिरी 4)बगदादमधील शोकांतिका 5)ऑपरेशन इंजिनीयर – कॅप्टन इस्रायलचा द्रोह आणि दुर्दैवं 6)ऑपरेशन पिग्मेलियन – सोव्हिएत हेर हेरेलच्या कचाट्यात 7)कृश्चेव्हचे भाषण – जे मिळविणे सी.आय.ए. लाही शक्यं नव्हते 8)ऑपरेशन अत्तिला- अडॉल्फ आईकमानचे धाडसी अपहरण 9)ऑपरेशन टायगर कब – बालक जेसेल शुमाकर – मोसादच्या वॉंटेड लिस्टवर 10)ऑपरेशन स्वोर्ड ऑफ दमोकल्स 11)ऑपरेशन पेनिसिलीन – इराकी मिग- 21चे धाडसी हरण 12)हर्बर्टस ककुर्स – आणखी एक नाझी कसाई मोसादच्या वरवंट्याखाली 13)ऑपरेशन ब्लॅंकेट – सिरीयन कुमारिकांची सुटका 14) ऑपरेशन नोहाज आर्क – फ्रांसमधून मिसाईल बोटींचे साहसी हरण 15)ऑपरेशन आयसोटोप – हवाई चाच्यांच्या ताब्यांतून प्रवाशांची सुटका 16)मोसाद विरुद्ध ब्लॅक सप्टेम्बर 17)ऑपरेशन ऑपेरा – इराकी अणुभट्टीचा विनाश 18)ऑपरेशन मोझेस – इथियोपियन यहुद्यांची सुटका 19)ऑपरेशन कानियुक – फरारी अणुहेर मोसादच्या मदनिकेच्या कचाट्यात 20)ऑपरेशन किल जिहाद 21)डॉ. जेराल्ड बुलची हत्या अन् सद्दामच्या सुपरगनचा चुराडा 22)किल खालेद – अम्मानमधील फसलेले ऑपरेशन 23)ऑपरेशन ऑर्चर्ड – सिरीयन अणुप्रकल्पाविरुद्धची कारवाई 24)कुख्यात दहशतवादी इमाद मुघनियेहची हत्या 25)इराणी अणुबॉम्ब विरुद्ध मोसाद 26)ऑपरेशन प्लाझ्मा स्क्रीन : दुबईतील गाजलेली मोहीम 27)लाइसेंस टू किल – बॉण्डपटातले नव्हे... वास्तवातले 28)जेकब कोहेन 29)वोल्फगॅंग लोत्झ आणि एलियाहू कोहेन परिशिष्ट – मोसादशी संबंधित काही व्यक्ती संदर्भ