इसायास अफेवेर्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इसायास अफेवेर्की
ኢሳይያስ ኣፈወርቅ

इरिट्रियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२७ एप्रिल १९९१
मागील पद स्थापना

जन्म २ फेब्रुवारी, १९४६ (1946-02-02) (वय: ७८)
अस्मारा, इरिट्रिया
सही इसायास अफेवेर्कीयांची सही

इसायास अफेवेर्की (तिग्रिन्या: ኢሳይያስ ኣፈወርቅ; २ फेब्रुवारी १९४६) हा आफ्रिकेतील इरिट्रिया देशाचा पहिला व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. अफेवेर्कीची इथियोपियापासून इरिट्रियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका होती. १९९१ साली तो राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाला.

१८ वर्षांच्या कारकिर्दीत अफेवेर्कीचे एक हुकुमशहा असे वर्णन केले जाते. त्याच्या राजवटीदरम्यान इथियोपियामध्ये मानवी हक्कांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केले जात असून संयुक्त राष्ट्रेअमेरिकेने त्याची दुष्ट कृरकर्मा ह्या शब्दांत निंदा केली आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]