इमारत तपासणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


इमारत तपासणी ही इमारत निरीक्षकाद्वारे केली जाणारी एक तपासणी आहे. इमारत निरीक्षकाला एकतर शहर, टाउनशिप किंवा काउन्टीद्वारे नियुक्त केलं जात आणि ते सामान्यत: एक किंवा अधिक शाखांमध्ये प्रमाणित असतात. जेणेकरून एखादी इमारत इमारत कोडची (building code) आवश्यकता पूर्ण करते की नाही याबद्दल व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी सक्षम राहतील . इमारत निरीक्षक एकतर निवासी किंवा व्यावसायिक इमारत निरीक्षक, एक प्लंबिंग, इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल निरीक्षक किंवा इतर विशिष्ट-लक्ष केंद्रित निरीक्षक म्हणून प्रमाणित केले जाऊ शकतात जे पूर्णत्वाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर संरचनांची तपासणी करू शकतात. [१] इमारत निरीक्षक थेट शुल्क् किंवा इमारत परवाना शुल्क् आकारू शकतात. तपासणी पूर्ण होईपर्यंत आणि मंजूर होईपर्यंत निरीक्षक बांधकामही थांबवू शकतात. [२]

काही इमारती तपासणी विशेष गोष्टी जसे वरकरणी दर्शनी भागांची तपासणी काही शहरे किंवा देशांकडून आवश्यक मानले जातात. हे कंत्राटदारांद्वारे नव्हे तर अभियंत्यांद्वारे केले जात आहेत. हा कायदा अवलंबणाऱ्या शहराचे उदाहरण म्हणजे क्युबेक, ज्याच कारण होत वरकरणी दर्शनी भागांच्या दुर्लक्षामुळे घडलेली एक जीवघेणा घटना. या तपासणी बऱ्याचदा करारीत इमारत तपासणीत समाविष्ट केल्या जातात परंतु कदाचित अभियंताप्रमाणे काळजीपूर्वक त्यांचे विश्लेषण केले जात नाही आणि त्याचे निदान केले जात नाही.

इमारत निरीक्षक[संपादन]

इमारत निरीक्षक हे बहुतेकदा सरकारद्वारे नियुक्त केलं जातात आणि त्यांना वारंवार राज्य किंवा आंतरराष्ट्रीय कोड कौन्सिल (आयसीसी) द्वारे प्रमाणित केले जाते. तपासणी ही इमारती, नळ, विद्युत, यांत्रिकी किंवा विशिष्ट कोड जसे की स्विमिंग पूल कोड जे त्या प्राधीकरणाने अमलात आणलेले असतात ज्या प्राधीकरण क्षेत्रात त्या इमारती मोडत असतात यांची पूर्तता करतात की नाही याकरीता केली जाते. आयसीसी प्रमाणित निरीक्षकांची अनेक श्रेणी आणि स्तर आहेत.

इमारत निरीक्षकांशी बऱ्याचदा स्ट्रॉटा मॅनेजर किंवा बॉडी कॉर्पोरेटर् पावसाच्या पाण्याच्या डिझाइनच्या समस्यांसह, स्ट्रक्चरल डिझाइन प्रपोजल किंवा सिव्हिल डिझाइन याबद्दल संपर्क केले जातात. याव्यतिरिक्त, बहुतेक वेळा परिषदेद्वारे बांधकामापूर्वी आणि नंतर कुचकामी अहवाल आणि आसपासच्या मालमत्ता आणि संबंधित परिषदेच्या मालमत्तांची इमारत तपासणी करणे आवश्यक असते हे सिद्ध करण्यासाठी की काम केल्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. बिल्डिंग इन्स्पेक्टरच्या अतिरिक्त कार्यात बहुतेक वेळा अस्तित्वात असलेल्या संरचनांचे मूल्यमापन केले जाते ज्यामध्ये भूकंप, वादळाच्या घटना, पूर आणि आग यांमुळे शारीरिक नुकसान झाले आहे तसेच परवानगी नसलेल्या बांधकामांचा समावेश आहे.

सल्लागार अभियंता बहुतेक वेळा जमिनीच्या गुणधर्मासंबंधी संरचनात्मक इमारत तपासणी करतात जिथे इमारतीच्या संरचनात्मक घटक असुरक्षित असल्याचे आढळते. बाल्कनीची तरतुद किंवा भिंतीमध्ये  पडलेल्या भेगा असो, सल्लागार अभियंता इमारत तपासणी करतात आणि योग्य मूल्यांकन करतात आणि त्यावर उपाययोजना करण्याच्या प्रस्तावानंतर जीर्णोद्धार अहवाल देतात.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Property inspections - NSW Fair Trading". nsw.gov.au.
  2. ^ Schmid, Karl F. (2014-06-24). Building Inspection Manual: A Guide for Building Professionals for Maintenance, Safety, and Assessment (इंग्रजी भाषेत). Momentum Press. ISBN 978-1-60650-616-5.