इडली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Idli Sambar.JPG

इडली (कन्नड: ಇಡ್ಲಿ, तामिळ: இட்லி, तेलुगू: ఇడ్డెనలు, मल्याळम: ഇഡ്ഡലി) हा मूळ भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशातून आलेला आणि भारतभर लोकप्रिय झालेला तांदळाचा एक खाद्यपदार्थ आहे. तांदूळ आणि उडदाची डाळ, किंवा तत्सम पदार्थ आंबवून आणि वाटून झालेल्या घट्टसर लगद्याच्या चकत्या वाफेवर उकडून इडली बनवली जाते. इडली वर्तुळाकार असते. तिची त्रिज्या २-३ इंच असू शकते. इडली बरोबर सांबार आणि ओल्या खोब्ऱ्याची चटणी खाल्ली जाते. इडलीची चव किंचित आंबट असते.. दक्षिणी भारतात इडली नाश्ता म्हणून खाल्ली जाते. महाराष्ट्रामध्ये हि नाश्तासाठी बनवली जाते .पूर्व तयारी शिवाय इडली करता येत नाही. पीठ पुरेसे भिजले नाही इडली फुगत नाही.

इडली प्रेशर कुकरमध्ये उकडता येते किंवा त्यासाठी एक वेगळे उकडपात्र असते.