Jump to content

इडर नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इडर नदी जर्मनीच्या मध्य भागातील नदी आहे. जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यात उगम पावून ही नदी हेसेन राज्यात फुल्डा नदीला मिळते.

या नदीचा उगम इडरकॉफ डोंगरावर होतो. या प्रदेशातील इतर नद्यांप्रमाणे ऱ्हाइन नदीला न मिळता ही नदी ईशान्येस सुमारे १७७ किमी वाहते व शेवटी उत्तर समुद्राला मिळते.

या नदीवर इडरसी धरण आहे. खडक आणि कॉंक्रीटने बनविलेले हे धरण १९१४मध्ये बांधले गेले होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश वायुसेनेने याच्यावर हल्ला करून हे फोडले होते.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Dildy, Douglas C. (2010). Dambusters; Operation Chastise. Osprey Raid Series No. 16. Oxford, UK: Osprey Publishing. p. 405. ISBN 978-1-84603-934-8.