आसू
Appearance
(आसू (फलटण) या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख तालुका फलटण , जि. सातारा येथील आसू गाव याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, तालुका फलटण , जि. सातारा येथील आसू गाव (निःसंदिग्धीकरण).
?आसू महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | फलटण |
विभाग | सातारा विभाग |
जिल्हा | सातारा जिल्हा |
तालुका/के | फलटण |
भाषा | मराठी |
गावाचे स्थान
[संपादन]आसू गाव महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या ईशान्येकडील एक गाव आहे. या गावाच्या तिन्ही बाजूंना नीरा नदीने वळसा दिलेला आहे. नदीपलीकडे शेजारी सोनगाव आहे. या दोन्ही गावांमध्ये नीरा-कऱ्हा नद्यांचा संगम आहे. गावात काळभैरवनाथाचे देऊळ आहे. या देवाच्या नावाने अक्षय्य तृतीयेनंतर तीन दिवसांनी गावात जत्रा भरते.
लोकसंख्या
[संपादन]आसू हे गाव फलटण तालुक्यातील शेवटच गाव आहे .गावामध्ये जवळपास ११८१ कुटुंब राहतात.[१]२०११ च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या ५८७६ आहे. ५८७६ पैकी ३०५१ पुरुष आणि २८२५ स्त्रियांची संख्या आहे. ० ते ६ वयोगटातील ७२६ मुल/मुली आहेत.० ते ६ वयोगटातील मुलांची संख्या एकूण लोकसंखेच्या १२.३६% आहे. गावामध्ये जवळपास सर्व जाती धर्माचे लोक राहतात. गावचा मुख्य व्यवसाय शेती आहे.